आजारी पतीला रुग्णवाहिकेतून घेऊन जाणाऱ्या महिले सोबत घडले असे
तिने आणि तिच्या भावाने विरोध केल्यावर पतीचे ऑक्सिजन मास्क काढून रस्त्यावर फेकले
उपचाराअभावी मृत्यू
सिद्धार्थ नगर / नवप्रहार डेस्क
उत्तरप्रदेश मधून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघड झाली आहे. यात लोकं किती निर्दयी झाले आहेत याचा प्रत्यय येतो. आजारी पतीला ऍम्ब्युलन्स मधून उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या पत्नीचा चालक आणि त्याच्या सहकाऱ्याने विनयभंग केला. महिलेने त्याचा विरोध केला असता तिच्या आजारी पतीला लागलेला ऑक्सिजन मास्क काढून पतीला रस्त्यावर फेकून पलायन केले. वेळेवर उपचार ण मिळाल्याने महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे.
या घटनेविषयी पीडित महिलेने सांगितलेकी, ‘रक्षाबंधनानंतर माझे पती खूप आजारी पडले. ते मुंबईत कामाला होता. त्यांना यकृताचा आजार होता. त्यांनी मुंबईतील डॉक्टरांचा सल्ला घेतला पण रक्त चढवल्यानंतरही त्यांची प्रकृती खालावतच गेली. कुटुंबीयांना त्यांची काळजी घेता यावी म्हणून ते पुन्हा सिद्धार्थनगरला आले. स्थानिक हॉस्पिटल त्याच्यावर उपचार करू शकले नाही. त्यांनी आम्हाला लखनऊच्या केजीएमयू ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवले. परंतु येथे रुग्णांची संख्या जास्त असल्याने त्यांनी अॅटमिट केले नाही. त्यानंतर एक रुग्णवाहिका भाड्याने घेऊन 27 ऑगस्टच्या रात्री अरवली मार्ग, इंदिरानगर येथील एका खाजगी रुग्णालयात पतीला दाखल केले. परंतु तिथे उपचाराचा खर्च इतका जास्त होता की आमची सर्व बचतही संपली.
ऑक्सिजन मास्कशिवाय पतीला श्वास घेता येत नव्हता
महिलेने सांगितले की, ‘माझ्या पतीला दोन रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याचे दोन लाख रुपये बिल झाले. माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते, त्यामुळे उपचाराचा खर्च भागवण्यासाठी माझ्या कुटुंबाने घराची जमीन गहाण ठेवली. मात्र पतीच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यांना ऑक्सिजन मास्कशिवाय श्वास घेता येत नव्हता. उपचाराचा खर्च इतका जास्त होता की डॉक्टरांकडून डिस्चार्ज घ्यावा लागला. यानंतर अहमदाबादमध्ये काम करणाऱ्या माझ्या भावाला मी मदतीसाठी फोन केला. तेव्हा कुणीतरी आम्हाला रुग्णवाहिकेचा क्रमांक दिला. 29 ऑगस्ट रोजी आम्ही संध्याकाळी 6:30 वाजता इंदिरानगर हॉस्पिटलमधून बाहेर पडलो. तोपर्यंत माझा भाऊ लखनऊला आला होता.
ड्रायव्हरने मला समोर बसण्यास सांगितले…
महिलेने सांगितले की, स्ट्रेचरवर पडलेल्या माझ्या नवऱ्याच्या शेजारी मी आणि माझा भाऊ बसलो होतो. अयोध्या बायपासवर पोहोचल्यावर ड्रायव्हरने मला समोर बसण्याची विनंती केली. पोलीस रात्रीच्या वेळी रुग्णवाहिका थांबवू शकतात, बाई बसलेली दिसली तर थांबणार नाही असे तो म्हणाला. ‘मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, पण तो आग्रह करत राहिला. काही वेळाने मी होकार दिला. पण ड्रायव्हर सूरज तिवारीला घाई नव्हती. अयोध्येतील एका ढाब्याजवळ त्यांनी रुग्णवाहिका थांबवली. त्यांनी जेवण केले आणि दारुही प्यायले.
त्यांनी माझ्या अंगावरून हात फिरवले….
पीडितेने सांगितले की, यानंतर ड्रायव्हर सूरज तिवारी आणि त्याचा साथीदार रुग्णवाहिकेत परतले आणि गाडीत दोन्ही बाजूंनी दोघे बसले आणि मी त्यांच्यामध्ये अडकले होते. सूरज तिवारीने गाडी सुरू केली. दोघे माझ्या जवळ आले, त्यांच्या श्वासातून येणाऱ्या दारूच्या वासाने मला गुदमरल्यासारखे वाटत होते. त्यांनी माझ्या अंगावरून हात फरवण्यास सुरुवात केली.मी त्यांना दूर ढकलले, परंतु ते खूप मजबूत होते. मी विरोध केल्यावर ते अधिक आक्रमक झाले. मी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण शक्य झाले नाही. मी ओरडले पण काचेच्या खिडक्यांमुळे माझा आवाज मागे भावापर्यंत जाऊ शकला नाही. तरीही माझ्या भावाला आणि नवऱ्याला समजले की मी संकटात आहे. माझ्या भावाने मदतीसाठी आरडाओरडा केला आणि ड्रायव्हरला थांबवण्यासाठी केबिनच्या भिंतीला धडक देण्यास सुरवात केली. पण सूरज तिवारी वेड्यासारखा गाडी चालवत राहिला. दोघांनीही मला सोडले नाही.
पतीला रुग्णवाहिकेतून काढून रस्त्यावर फेकले…
पीडिता म्हणाली, मी तासाभराहून अधिक काळ सीटवर बसून होते. आम्ही एका वस्तीजवळ पोहोचताच ते दोघेही माझ्यावर खूप चिडले. सुरज तिवारीने स्त्यावर रुग्णवाहिका थांबवली. दोघेजण खाली उतरले, मागचा दरवाजा उघडला आणि माझ्या पतीचा ऑक्सिजन मास्क काढला. माझ्या भावाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्याला ढकलून दिले. त्यानंतर त्यांनी माझ्या पतीला स्ट्रेचरमधून बाहेर काढले आणि रस्त्यावर फेकून दिले, नंतर माझ्या भावाला ओढून बाहेर नेले, त्याला माझ्या शेजारी असलेल्या ड्रायव्हरच्या केबिनमध्ये कोंबून आणि लॉक केले. रुग्णवाहिका चालक आणि त्याच्या साथीदाराने तिच्या पर्समधून 10,000 रुपये, तिचे मंगळसूत्र आणि तिने घातलेले पैजन हिसकावले आणि आणि तेथून पळून गेले, असेही पीडितेने सांगितले.
उपचाराअभावी पतीचा मृत्यू झाला…
पीडितेने सांगितले की, ‘माझ्या भावाने 112 आणि 108 डायल केला. पोलीस आणि रुग्णवाहिका एकत्र घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी आमचे म्हणणे ऐकले आणि एफआयआर दाखल करण्यासाठी परत या, पण आधी पतीला रुग्णालयात दाखल करा असा सल्ला दिला. 108 रुग्णवाहिकेने आम्हाला बस्तीच्या जिल्हा रुग्णालयात नेले. तोपर्यंत माझ्या पतीची प्रकृती बिघडली होती. हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यास सांगितले. पण गोरखपूरला पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.