हटके

आधी बाजारात फिरली ‘ब्रा ‘ घालून आता म्हणते माझी चूक झाली 

Spread the love

इंदूर /. नवप्रहार डेस्क

 एक तरुणी शहरातील बाजारात ‘ब्रा ‘ घालून फिरल्याने तिचे व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाले. त्यावर नेटीझन्सनीं वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर तरुणीने सुरवातीला ज्यांना मला प्रश्न विचारायचे आहेत त्यांना माझ्या घरचा पत्ता द्या. असा पवित्रा घेतला होता. महिला संघटनाकडून विरोध झाल्यावर मात्र तिने समाज माध्यमावर  पुन्हा दुसरा व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे.

 या तरुणीने अनेक मुली असे कपडे घालतात, मी त्यापेक्षा काही वेगळे केलेले नाही, मला काही प्रॉब्लेम नाही, ज्यांना असेल त्यांनी मला भेटू शकतात, असे म्हटले.नेटकऱ्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना तरुणी म्हणाली की, मी बातम्यांमध्ये झळकत आहे, कारण त्यांना व्ह्यूज हवे आहेत. मला वाटते मी आणखी चॅनल्सवर दिसेल. आता आठवडाभर असेच सुरू राहणार. मला त्याच्याशी काही घेणे- देणे नाही. जर कोणाला माझ्याविरोधात तक्रार दाखल करायची असेल तर, त्यांना माझ्या घराचा पत्ता द्या.’ मात्र, त्यानंतर हे प्रकरण चिघरळे.

इंदूरमध्ये अशा अश्लीलतेला स्थान नाही

खासदार कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, ‘ही बाब माझ्याही लक्षात आली . याविरोधात काही महिला संघटना पोलीस आयुक्तांना निवेदन देणार आहेत. इंदूर हे सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. इंदूरमध्ये अशा अश्लीलतेला स्थान नाही. प्रत्येकाला कपडे घालण्याची, खाण्याची, पिण्याची मुभा आहे, पण हा मूलभूत अधिकारांचा गैरवापर होता कामा नये. प्रशासनाने कारवाई करावी आणि समाजाने अशा लोकांवर बहिष्कार टाकावा.’

तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

इंदोर शहरातील अनेक संघटनांनी या विरोधात आवाज उठवत तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एका तरुणीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती मिळाली. काही संघटनांनी या तरुणीवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदनही दिले. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.’

अखेर मागितली सर्वांची माफी

दरम्यान, तरुणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ती लोकांची माफी मागत आहे. ‘सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माझ्या व्हिडिओ मी तोकडे कपडे घातले आहेत. माझ्याकडून चूक झाली. मी सार्वजनिक ठिकाणी असे कपडे घालायला नको होते. या व्हिडिओंमुळे ज्यांची मने दुखावली गेली, त्या सर्वांची मी माफी मागते. मी पुन्हा असे करणार नाही. मी यापुढे सार्वजनिक ठिकाणी असे कपडे घालणार नाही.’

 

 

 

 

पोलीस तपास सुरू

पीटीआयच्या वृत्तानुसार, तरुणीने सोशल मीडियावर असा दावा केला आहे की, ती दुबईत राहते. पोलीस उपायुक्त हंसराज सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी महिलेच्या माफीचा ताजा व्हिडिओही पाहिला आहे. सार्वजनिक ठिकाणी छोटे कपडे घालून फिरण्यामागे त्या तरुणीचा हेतू काय होता? कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करून योग्य ती कारवाई करू.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close