हटके

अन अख्खा ट्रक खड्ड्यात घुसला 

Spread the love

पुणे   / नवप्रहार डेस्क 

               पुण्यात एक अजब घटना घडली आहे. याठिकाणी एका खाजगी इमारतीच्या आत पडलेल्या खड्ड्यात घुसला. जवळील ड्रेनेज साफ करण्यासाठी हा ट्रक आला होता. तेथील जवळील इमारतीच्या खालून भूमिगत मेट्रो गेलीय आणि हा ट्राक याच मेट्रोच्या खड्यात पडला.

दरम्यान जवळील सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली. या घटनेनंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.नशिबाने या घटनेत कुणी जखमी झालेलं नाही. खड्यात अडकलेल्या ड्रायव्हरला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.

इमारतीच्या आवारात अचानक पडलेला हा खड्डा, साधारणपणे 25 फूट खोल आहे. ट्रकसह दोन दुचाकीही खड्ड्यात पडल्या आहेत.

ही इमातर 1925 साल जूनी असून त्याखालूनच 100 फूट मेट्रोचे भुयार गेले आहे. व्हिडीओत हे स्पष्ट दिसतंय की चेंबरचा खड्डा त्या भागात पडला आहे. ज्यामध्ये हा ट्रक पडलेला आहे. पालिकेचा साफसफाई करणारा ट्रक त्या ठिकाणी नालेसफाईसाठी आला असताना ही घटना घडली.

या घटनेत ट्रकच्या मागचा भाग खचला आणि सरळ त्यात गेला. व्हिडीओत हे स्पष्ट दिसल आहे की ट्रकचं जे कॅबिन आहे, ते जमीनीच्या वरच्या बाजूला आहे.

जर प्लानिंगनुसार या भागातील मेट्रोचं आणि आजाबाजूच्या परिसरातलं काम केलं गेलं असेल तर मग या ठिकाणी हा खड्डा कसा पडला? असा प्रश्न उपस्थीत होत आहे. शिवाय ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलं गेलं, त्याला या खड्याचा अंदाज आला नव्हता का? त्याने थेट पेवरब्लॉक कसे काय टाकले? त्याने आपल्या कामात हलगर्जीपणा केला, असे आरोप देखील आता लोकांकडून केले जात आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close