पितृपक्षाच्या पावन पर्वावर श्रीमद भागवत कथा महायज्ञ सप्ताह.
.
# शिवभक्त परिवाराचे चांदुर रेल्वे नगरीत आयोजन.
*चांदुर रेल्वे (ता. प्र.) प्रकाश रंगारी*
चांदुर रेल्वे :- पितृपक्षाच्या पावन पर्वावर श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन शिवभक्त परिवार व चांदुर रेल्वे नगरी यांनी केलेले आहे. या अमृत श्रीमद् भागवत कथा व महायज्ञा करिता
सुप्रसिद्ध कथा वाचक भागवताचार्य श्री. शिवम कृष्णाजी महाराज श्रीधाम वृंदावन निवासी यांच्या
सुमधुर, संगीतमय,अमृतवाणीतुन कथा व प्रवचन करणार आहेत. आपण सह परिवारासह उपस्थित राहून, ह्या महा कुंभाचा लाभ घेऊन पुण्याचे भागीदार बना. असे आव्हान शिवभक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.
*कथा प्रारंभ 21 सप्टेंबरते 27 सप्टेंबर 2024 कथा स्थळ यशवंत मंगल कार्यालय चांदुर रेल्वेआणि वेळ 2 ते 6*
कथेचा प्रारंभ 21 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी आठ वाजता श्रीराम मंदिर येथून सुरुवात होईल. चांदुर रेल्वे तालुक्यातील व शहरातील महिला व पुरुष दिंडी निघेल.श्रीराम मंदिरापासून भव्य कलश यात्रेला प्रारंभ होऊन, विरूळ रोड चौकातून कथा स्थळ यशवंत मंगल कार्यालय येथे कलश यात्रा पोहोचल्यानंतर श्रीमद् भागवत कथेची सुरुवात दुपारी दोन वाजता पासून होणार आहे. दि.21 सप्टेंबर 2024 ला श्रीमद् भागवत महात्म्य, नारद चरित्र
रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 कपिलोपाख्यान, सती व ध्रुव चरित्र या विषयावर व्याख्यान होईल. सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 जडभरत प्रसंग, प्रल्हाद चरित्र
व नरसिंग अवतार. मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 वामन चरित्र, श्रीराम प्रसंग श्रीकृष्ण जन्मोत्सव.
बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024
श्रीकृष्ण बाललीला गोवर्धन पूजा, छप्पण भोग.
गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024
उद्धव चरित्र, कृष्ण रुक्मिणी विवाह.
शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024
सुदामा चरित्र परीक्षित मोक्ष,सुकदेव बिदाई यावर कथा सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत त्यानंतर हवन पूर्णाहुती व महाप्रसाद दुपारी 1 वाजता पासून तर 4 वाजेपर्यंत शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 राहील. याप्रमाणे हा सात दिवसांचा भागवत सप्ताह असेल अशी माहिती शिवभक्त परिवाराकडून पत्रकार परिषदेमध्ये मिळाली. यावेळी पत्रकार परिषदेला शिवभक्त परिवारातर्फे गोकुल जालान,किशोर गंगन, हर्षल वाघ,सचिन वर्मा,देवेश बाजपेयी, नरेश पणपालिया,कन्हैया वाधवाणी, अशोक जालान,मनीष राय,राजू जालान,गोपाल कलावटे,अरविंद जयस्वाल व शिवभक्त परिवार उपस्थित होते.