हटके

पतीच्या या सवयीला कंटाळून पत्नी लगांच्या ४० दिवसातच पोहचली पोलीस ठाण्यात 

Spread the love

आग्रा / नवप्रहार डेस्क 

                   लग्नानंतर काही महिने नवरा बायको ला एकमेकांना समजून घेण्यात लागतात. त्यांना एकमेकांच्या आवडी निवडी समजून घेण्यात लागतात . पण लग्नाच्या ४० दिवसाच्या कालावधीत एक महिला आपल्या पतीच्या त्या सवयीला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये पोहचली. चला तर जाणून घेऊ या मागील कारण.

आग्र्यातील तरुणीचं लग्न ४० दिवसांपूर्वी एका तरुणासोबत झालं. लग्नानंतर पत्नी जेव्हा पतीला अंघोळीसाठी जायला सांगायची तेव्हा तो टाळायचा. पत्नीने जबरदस्ती केली तर पतीने अंगावर गंगाजल शिंपडून घेतलं. हे सतत व्हायला लागल्यानं पत्नीने सासरच्या मंडळींना हे सांगितलं. त्यावेळी सासरच्या मंडळीनी जे सांगितलं त्यानंतर पत्नीने थेट माहेर गाठलं.

पत्नीने माहेरी गेल्यानंतर पोलिसात तक्रार केली. तिने म्हटलं की, पती मारहाण करतो आणि हुंड्यासाठी छळ करतो. पती-पत्नीला समुपदेशकांनी बोलावलं तेव्हा पत्नीने मारहाणीसह अंघोळ न करण्याचा आरोपही पतीवर केला. ४० दिवसात पतीने फक्त सहा वेळा अंघोळ केली. घाणेरडा राहतो, अंघोळीचं सांगितलं तर मारहाण करतो. अंगावर गंगाजल शिंपडून घेतो आणि वेळ मिळाला तर अंघोळ करतो असंही पत्नीने सांगितलं.

समुपदेशकांनी सांगितलं की, पती आणि पत्नीला बसून समाजवलं तेव्हा पत्नीने आगळी वेगळी अट ठेवली. पत्नीने म्हटलं की, जोपर्यंत पती दररोज अंघोळ करणार नाही तोपर्यंत त्याच्यासोबत राहणार नाही. पोलीस आणि समुपदेशकांसमोर पतीने लिहून द्यावं की तो दररोज अंघोळ करेन. आता दोघांनाही पुढची तारीख देण्यात आली असून पुन्हा त्यांचे समुपदेशन केले जाईल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close