लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष प्रकाश बाळबुधे यांच्या क्षेत्र भेटी
*लाखांदूर व साकोली तालुक्यातील ११३ गावाचा केला दौरा*
*विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडण्याचे केले आवाहन*
साकोली:– स्थानिक विधानसभेत ‘माझी लाडकी बहीण योजने’ची अंमलबजावणी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे हे गावा-गावांत भेटी देत आहेत.
महायुती सरकारच्या प्रयत्नांतून अवतरलेल्या ‘माझी लाडकी बहीण योजने’च्या नोंदणीची मुदतवाढ आता येत्या ३० सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे.त्यामुळे यापूर्वी अपात्र ठरलेल्या तसेच अर्ज करू न शकलेल्या महिलांना नोंदणी करण्याची पुन्हा नवी संधी उपलब्ध झाली आहे.त्यामुळे नव्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी साकोली विधानसभा क्षेत्राचे ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या शासकीय समितीचे अध्यक्ष प्रकाश बाळबुधे यांनी योजनेच्या अंमलबाजवणीच्या हेतूने गावा-गावांत जनजागृती करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती दिली.आतापर्यंत त्यानी लाखंदूर तालुक्यातीत ४९ गावे तर साकोली तालुक्यातील ६४अशा एकुण ११३ गावातील बहिणीच्या भेटी घेतल्या.
यावेळी बाळबुधे म्हणाले की,”लाडकी बहीण योजना”ही राज्य सरकारची आजवरची सर्वांत महत्त्वाकांक्षी योजना आहे. महिला सक्षमीकरण आणि त्यांचे आर्थिक स्वावलंबन वाढण्याहेतूने या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. मात्र, विरोधकांनी या चांगल्या योजनेविरोधात खोट्या बातम्या पसरवण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.आजवर एकट्या साकोली विधानसभा क्षेत्रातच ९० हजारहून अधिक बहीणीनी अर्ज केला आहे व आजपर्यंत ६८ हजा महिला लाभार्थ्यांना खात्यात पैसे जमा झाले आहेत.एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहू नये यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता.उरलेल्या सर्व गावात ते जाणार असल्याचे त्यानी सांगितले.