क्राइम

वहिनीने दिराला प्रेमाने घरी बोलावून त्यांचा प्रायव्हेट पार्ट कापला 

Spread the love

सिधी (मध्यप्रदेश ) / नवप्रहार डेस्क

                     मध्यप्रदेश मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सीधी जिल्ह्यातील ऐका महिलेने दीराला प्रेमाने घरी बोलावले. त्याला खोलीत घेऊन गेली आणि धारदार शस्त्राने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. वेदनेने तो विव्हळत असताना घरच्यांना त्याचा आवाज ऐकू आल्याने कुटुंबीयांनी त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले. त्याच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. कुटुंबियांच्या मते शेतीच्या वादातून हा प्रकार घडला. तर गावात वेगळीच चर्चा आहे.

 पोलिसांनी दीराच्या तक्रारीवरुन वहिनी विरोधात गुन्हा नोंदवला आहे. जखमी दीराला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली.

या घटनेनंतर परिसरात आणि कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे. या बद्दल ऐकणारा प्रत्येकजण हैराण आहे. पोलिसांनी जखमी दीराची चौकशी केली. जमिनीच्या वादातून हा हल्ला झाला असा दीराचा दावा आहे. सीधी जिल्ह्यातील वनांचल कुसमी भागातील ही घटना आहे. एका महिलेने जमिनीच्या वादातून दीराला जखमी केलं.

तो खोलीत गेल्यानंतर….

गावातील लोकांमध्ये या बद्दल विविध चर्चा सुरु आहेत. पोलिसांनी आरोपी वहिनी विरोधात कारवाई केली आहे. घरात जमिनीवरुन वाद आहेत. रात्री वहिनीने मला प्रेमाने घरी बोलावलं. तो खोलीत गेल्यानंतर धारदार शस्त्राने त्याचा प्रायवेट पार्ट कापला. या हल्ल्यानंतर तो वेदनेने विव्हळत होता. कुटुंबियांना या बद्दल समजल्यानंतर ते जखमी दीराला कुसमी सामुदायिक स्वास्थ्य केंद्रात घेऊन गेले.

मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव

मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. युवकाच्या तक्रारीवरुन वहिनी विरोधात गुन्हा नोंदवल्याच सीधीच्या एसएसपीने सांगितलं. वहिनीने प्रायवेट पार्टवर हल्ला केल्याचा आरोप युवकाने केला आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. आरोपी महिलेविरोधात कारवाई सुरु आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close