काळया मातीची सेवा करणारे ‘ dadaa’
“दादांचा” जन्म दि. ०१/०६/१९५२ रोजी नागपंचमीच्या दिवशी उंचखडक बुद्रुक या छोट्याश्या खेड्यात झाला,आपलं मॅट्रिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर दादांना बँकेत नोकरी लागली परंतु आपल्यापेक्षा लहान भावंडांचे शिक्षण सुरु असल्यामुळे त्यांनी त्या नोकरीला रामरामठोकत “काळ्या मातीची सेवा करण्याचे ठरविले”.पुढे धाकटे बंधु अगस्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तसेच अगस्ती कारखान्याचे जेष्ठ संचालक अशोकराव भाऊसाहेब देशमूख(आण्णा) यांनी देखील आपले मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण करून समाजकारण राजकारण करण्याचे ठरवले,तीन नंबर बंधु शरद भाऊसाहेब देशमुख यांनी शिक्षण पूर्ण करून माध्यमिक शिक्षक म्हणून पुणे येथे सर्व्हिस केली,चार नंबरचे भारत देशमूख यांनीअगस्ती कारखान्यात स्थापत्य इंजिनीअर म्हणून काम केले तर सगळ्या शेवटचे नंदकुमार देशमूख यांनी शिक्षण पूर्ण करून कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थापत्य उपअभियंता म्हणून काम केले तसेच कल्याण ठाणे परिसरात समाजकारणाच्या मध्येमातून मोठे नाव कमवले. अशा पाच भावंडांच्या एकत्रित कुटुंबाची जबाबदारी आपल्यापेक्षा लहान भावावर निःस्वार्थ विश्वास ठेवत अशोकराव देशमूख (आण्णावर) देऊन आपण फक्त काळ्या मातीचीच सेवा करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळली.आण्णांनी देखील या विश्वासाला तडा जाऊ न देता दादांच्या दोन मुली,दोन मुलं यांची शिक्षणं पूर्ण करून मोठी मुलगी मधुबालाला(बालुताई) निमगावजाळी येथील जोंधळे कुटुंबात प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज वर प्राध्यापक असलेले संजय जोंधळे यांच्या सोबत विवाह करून दिला तर दुसरी मुलगी शैला(शैलाताई) ला धांदरफळ येथील प्रगतशील देशमूख कुटुंबात सेवा सोसायटीचे माजी व्हा. चेअरमन अशोकराव देशमुख यांच्या सोबत विवाह करून दिला आज दोघींचे मुलं मुली पुणे येथील आयटी कंपनीत कार्यरत आहे.मोठा मुलगा महिपाल देशमुख(बबनभाऊ) पदवी शिक्षण पूर्ण करून त्यांना बुवासाहेब नवले पतसंस्थेत नोकरीस लावले परंतु चुलत्याच्या सामाजिक राजकारणाचा आदर्श घेत गावात समाजकारणास सुरवात केली व पुढे उंचखडक बुद्रुकचे सरपंच,उपसरपंच तसेच बुवासाहेब नवले पतसंस्थेत संचालक म्हणून काम करत आहे व लहान मुलगा शाम देशमूख हा उत्तम शेती करत आहे अशाप्रकारेदादांनी मुलांच्या करिअर बाबत कुठलाही हस्तक्षेप न करता भावावर विश्वास ठेवला.खरं तर भावावर इतका विश्वास टाकणारे भाऊ आजच्या युगात क्वचितच पाहवयास मिळतात.आपल्या शेवटच्या क्षणी दादांना मेंदूचा व प्यार्लेसीस आजार झाला परंतु म्हणतात ना की जे पेरलं तेच उगवतं त्याप्रमाणे आमच्या आज्जी व बाबांची दादा, आण्णा,काका सह सर्व चुलत्यांनी काळजी घेतली त्याच प्रमाणे आमची चुलती वाहिनी,बबनभाऊ, नातू यशराज यांनी काळजी घेतली परंतु कळासमोर कोणाचं काही चालत नाही अखेर शनिवारी दि.२४-०८-२०२४ त्यांची प्राणज्योत माळवली अशा आमच्या दादांना भावपुर्ण आदरांजली अर्पण करतो,त्यांच्या पच्छात चार भाऊ, दोन मुलं आणि दोन मुली,पुतणे,पुतण्या असा मोठा परिवार आहे.त्यांचा दशक्रियाविधी हा सोमवार दि.०२ सप्टेंबर २०२४ रोजी उंचखडक बुद्रुक येथे प्रवरातीरी श्री क्षेत्र राममाळ येथील पाणवठ्यावर होणार आहे.याप्रसंगी ह.भ.प. दीपक महाराज देशमुख यांचे प्रवचन होणार आहे.
तात्यासाहेब अशोकराव देशमूख
अध्यक्ष /संस्थापक – मातोश्री शांताई देशमूख सोशल फाउंडेशन, अकोले.