कुत्र्याने लचके तोडल्याने तरुणाचा मृत्यू
कुत्र्याने लचके तोडल्याने तरुणाचा मृत्यू
२२ वर्षीय तरुण करत होता कुत्र्याचा सांभाळ
सतत तीन तास कुत्रा करत होता तरुणावर halla
विक्रोळी / विशेष प्रतिनिधी
पिटबूल जातीच्या कुत्र्याकडून अनेक लोकांवर हल्ले झाल्याच्या घटना एकविण्यात होत्या. पण आता ग्रेड डेन जातीच्या कुत्र्याने टायचा सांभाळ करणाऱ्या २२ वर्षीय तरुणावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. गोदरेज कंपनीमध्ये हा प्रकार घडला आहे. ग्रेड डेन जातीच्या या कुत्र्याला गस्त घालण्यासाठी या ठिकाणी एरका कंपनीने ठेवले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी गोदरेज कंपनीमध्ये गस्त घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या कुत्र्याने त्याचा सांभाळ करणाऱ्याचा निर्घृणपणे जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. हसरत अली बरकत अली शेख (२२) असं या मृत तरुणाचं नाव आहे.
गोदरेजमध्ये मार्शल डॉग एजन्सी या कंपनी मार्फत ही श्वान सिक्युरिटी देण्यात येते. या कुत्र्यांना कंपनीच्या आवारात घेऊन फिरण्याचं काम इथं हसरत अली याच्या सारखे कसाही तरुण करीत असतात. हसरत अलीकडे ग्रेट डेन जातीच्या कुत्र्याला घेऊन फिरण्याची जबाबदारी होती. मात्र सोमवारी सकाळी तो नेहमी प्रमाणे या कुत्र्याला घेऊन फिरण्यासाठी गेला असता त्याने हसरत अलीवर जोरदार हल्ला केला. सुमारे अडीच तास हा हल्ला सुरू होता. या कुत्र्याने या तरुणाचे लचके तोडले. रक्तबंबाळ झाल्यामुळे तो जागेवरच बेशुद्ध पडला. पण तरीही या कुत्र्याने त्याला सोडलं नव्हतं.
घटनेची माहिती मिळताच पोलीस , पालिका श्वानपथक आणि काही प्राणी मित्र घटनास्थळी दाखल झालं. कुत्र्याला हसरत अली पासून लांब करण्याचा प्रयत्न करू लागले. पण वारंवार कुत्र्याचा हल्ला सुरूच होता.अखेर ३ तासाने या कुत्र्याला हसरत अलीपासून दूर करण्यात यश मिळालं. हसरत अलीला तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र अतिशय गंभीर जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मार्शल डॉग एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.