क्राइम

शिक्षिकेचे प्रेम : प्रियकाराचा केला गेम 

Spread the love

नाशिक  / नवप्रहार डेस्क 

                प्रियकर जास्त त्रास इथे असल्याने शिक्षिका असलेक्या प्रेयसीने सुपारी देऊन प्रियकराची  हत्या केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. गगन कोकाटे असेबट्या तरुणाचे नाव आहे. 

  नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये गगन कोकाटे या 26 वर्षीय तरुण मृत अवस्थेमध्ये आढळून आला. गगन हा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झालेले प्रविण शहाजी कोकाटे यांचा मुलगा होता.

गगन कोकाटे या मयत युवकाचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या 39 वर्षीय शिक्षिकेसोबत प्रेम संबंध होते, मात्र गगनकडून या महिलेला त्रास दिला जात होता.गगनच्या त्रासाला कंटाळून महिलेने तिच्याच शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने एका टोळीला 2 लाख रुपयांची सुपारी दिली आणि गगनची हत्या घडवून आणली.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 5 आरोपींना अटक केली आहे. यातील 2 आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close