जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिवरा(तांडा)येथे भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा
आर्वी / प्रतिनिधी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिवरा(तांडा)येथे भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच सौ.बेबीताई मसराम व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री पंकज जावळकर उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालय हिवरा येथील ध्वजारोहण सरपंच बेबीताई मसराम यांनी केले तर हिवरा शाळेचे ध्वजारोहण मुख्याध्यापक श्री सुरेश ताजणे सर यांनी केले.७७व्या वर्धापन दिनानिमित्त शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री अविनाश ल टाके यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व सांगितले. यानंतर गावात प्रभातफेरी काढण्यात येवून, भारतमातेच्या जयजयकाराच्या गगणभेदी घोषणा देण्यात आल्या. स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे संचालन श्री अविनाश टाके तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री सुरेश ताजणे. यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय येथील सरपंच व इतर पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते