भंडारा येथील लेक मिसेस इंडिया क्वीन स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर
जवाहरनगर ( भंडारा) :- भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर परिसरातील ठाणा पेट्रोल पंप येथील डॉ. निन्नी रईसा भोतमांगे या लेकीने मिसेस इंडिया स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला असून देश पातळीवर भंडारा जिल्ह्यासह जवाहरनगर परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
८ ते १० ऑगस्ट २०२४ या कालावधीत दिल्ली जवळील आय. टी. सी. द्वारका ( उत्तरप्रदेश) येथे मिसेस इंडिया क्वीन २०२४ चे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध बॉलीवूड स्टार अमन वर्मा, अशनीर ग्रोव्हर,रितिका यादवा व विनय यादवा यांचे हस्ते
मिसेस इंडिया क्वीन २०२४ च्या स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाच्या राणीचा मुकुटानी सन्मानित करण्यात आले.
विजेत्यांच्या चिकाटी, समर्पण आणि सक्षमीकरणाच्या कथा उपस्थित सर्वांच्या मनाला भिडल्या. त्यांचे विजय हे फक्त वैयक्तिक यश नव्हते, तर मूळ चे भारतीय रहिवाशी पण सध्या कामाच्या शोधात जगभरातील विविध देशात स्थाईक झालेल्या व भारतातील विविध राज्यातील विवाहित महिलांच्या शक्ती, सामर्थ्य आणि जिद्दीचे प्रतीक होते.ते या विवाहित स्पर्धकांनी या स्पर्धेत प्राविण्य प्राप्तीसाठी सादर केल्या गेले.यात डॉ.निन्नी भोतमांगे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.
डॉ. निन्नी रईसा भोतमांगे यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. ही स्पर्धा
प्रसिद्ध बॉलीवूड स्टार रितिका यादवा व विनय यादवा यांनी आयोजित केली होती.
……………………………….