अपघात

एसटी च्या चाकाखाली बाईक आली ; बाईक चालक आणि एसटी जळून खाक 

Spread the love

सातारा / नवप्रहार डेस्क .

                          काही अपघात असे असतात की ते पाहिल्यावर काही वेळ पर्यंत डोळ्यावर विश्वासाचं बसत नाही. कारण क्षणात असल्याचे नसले होऊन बसते. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता भुईंज, ता. वाई येथे घडली. बाईक स्वार एस टी खाली आल्याने तो  बस क्या पुढील चाकाखाली अडकला. त्यामुळे दुचाकी काही अंतर स्त्यावर घासत गेली. यामुळे आगीच्या ठिणग्या उडुंन बाईक ने पेट घेतला. त्यामुळे एसटी ने देखील पेट घेतला. एस टी क्या चाकाखाली अडकलेल्या बाईक स्वाराला बाहेर निघता न आल्याने एस टी सह तो ही जाळुन खाक झाला.

पुण्याहून पलूसकडे एसटी निघाली होती. एसटीमध्ये प्रवाशी खचाखच भरले होते. महामार्गावरील भुईंज येथील विरंगुळा पेट्रोल पंपाजवळ एसटी आल्यानंतर अचानक पुढील डाव्या बाजूच्या चाकाखाली दुचाकीस्वार अडकला. डांबरावर दुचाकी घासत गेल्याने स्पार्किंग झाले. त्यामुळे दुचाकीला आग लागली. एसटीच्या चाकाखाली दुचाकीस्वार अडकला होता. त्यालाही बाहेर निघता आले नाही. एसटीलाही आग लागल्याचे समजताच चालक व वाहकाने प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. घाईगडबडीत प्रवाशांच्या बॅगा एसटीतच राहिल्या. प्रवाशांनी खिडकीतून, दरवाजातून उड्या मारून आपला जीव वाचवला. सर्व प्रवासी व चालक, वाहकाने खाली उतरून अग्निशमन दलाला याची माहिती दिली. पाहता पाहता आगीने राैद्ररूप धारण केले. काही क्षणातच संपूर्ण एसटी आगीच्या भक्षस्थानी पडली. वाई नगरपरिषद व भुईंज कारखाना येथून अग्निशमश दलाची गाडी घटनास्थळी आली. त्यांनी पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत एसटीसह दुचाकीस्वारही जळून खाक झाला. त्या मृत दुचाकीस्वाराची रात्री उशिरापर्यंत पोलिसांना ओळख पटली नव्हती. भुईंज पोलिस या अपघाताचा तपास करीत आहेत.

पोलिस भरतीसाठी गेलेल्या तरूणीची कागदपत्रे जळाली

पोलिस भरतीहून एक तरूणी पुण्याहून कऱ्हाडला निघाली होती. एसटीला आग लागल्यानंतर तिची बॅग एसटीमध्येच राहिली. त्या बॅगमध्ये मूळ शैक्षणिक कागदपत्रे होती. ही कागदपत्रे जळून खाक झाली. अग्नीशामक यंत्रणा लवकर आली असती तर माझी कागदपत्रे वाचली असती, अशी संतप्त भावना त्या तरूणीने  व्यक्त केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close