राजस्व पंधरवडा दिनानिमित्त तहसील कर्मचाऱ्यांनी काढली तिरंगा रॅली
13 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन.
*चांदुर रेल्वे ( ता. प्र.) प्रकाश रंगारी*
राजस्व दिनाच्या निमित्याने तहसील व उप विभागीय कार्यालयात स्वराज पंधरवडा साजरा केल्या जात आहे. यानिमित्ताने उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे, तहसीलदार पूजा मातोडे, यांच्या मार्गदर्शनात दैनंदिन विविध कार्यक्रम साजरे केले जात आहे. यामध्ये सोमवारी अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी यांनी तिरंगा रॅली काढली. मंगळवारी 13 /08/
2024 ला रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
राजस्व पंधरवाडाच्या निमित्याने मुख्यमंत्री- माझी लाडली बहीण योजना, मुख्यमंत्री युवक कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, सुंदर माझं कार्यालय, मूकबधिर विद्यालयाचे विद्यार्थी यांना हिवाळा लक्षात घेऊन स्वेटर वाटप, ई पीक पाहणी, स्वराज संवर्ग सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या सोबत चर्चा व उत्कृष्ट सेवा पुरस्कार असे कार्यक्रम नियोजित करण्यात आले.
यावेळी चांदुर रेल्वे तहसील चे नायब तहसीलदार सुधाकर अनासाने व लक्ष्मीकांत तिवारी यांच्या मार्गदर्शनात तिरंगा रॅली काढण्यात आली.
रॅलीमध्ये भारत माता की जय असा
जयघोष करण्यात आला. उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे व तहसीलदार पूजा मातोडे यांच्या मार्गदर्शनात पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता
तहसीलदार सुधाकर अनासाने, लक्ष्मीकांत तिवारी, प्राजक्ता बारदे पटवारी दीपक चव्हाण, योगेश वंजारी, प्रफुल गेडाम, रहीम पठाण,धम्मपाल वानखडे, सतीश वराडे, कमल गाठे, राजेश्वर मलमकर, अरविंद सराड, दीपक शिरसाट, प्रीती बाजड, अंकुश चवरे, सतीश काकडे,प्रफुल देशमुख, राहुल कुकडी, नेहा शर्मा, भाग्यश्री गायकवाड, राहुल सावंत, चंद्रकांत जयसिंगपूर, चव्हाण
यांनी अथक परिश्रम घेत आहे.