शैक्षणिक
Related Articles
Check Also
Close
उन्नाव ( युपी ) / नवप्रहार डेस्क
ज्या शाळेतील शिक्षकांवर विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी असते त्या शाळेतील शिक्षक रोमान्स करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण जर शाळा किंवा महाविद्यालयाचे संचालकच जर महिला शिक्षकाकडे अनुचित मागणी करत असेल तर त्यात महिला शिक्षिकेचा काय दोष ? . सोशल मीडियावर महिला शिक्षिकेला व्यवस्थापका कडून अश्लील मागणी करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल हित आहे. हा व्हिडिओ त्या शिक्षिकेने स्वतःच बनवला आहे.
25 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये व्यवस्थापक रवि प्रताप गोयल महिला शिक्षिकेसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहेत.
सदर घटना उत्तर प्रदेशामधील उन्नाव जिल्ह्यातील एका खासगी इंटर कॉलेजमध्ये येथे घडली आहे. या व्हिडीओमध्ये कॉलेज व्यवस्थापक अश्लील हावभाव करत महिला शिक्षिकेकडून किस (KISS) ची मागणी करताना दिसत आहे. या महिला शिक्षिका व्यवस्थापकाजवळ अर्ध्या दिवसाची रजा मागण्याकरीता गेल्या होत्या. त्यावर माझी अट पूर्ण केल्यास अर्धा दिवस रजा मिळेल असे व्यवस्थापकाने सांगितले.
व्यवस्थापकाने अटची मागणी केल्यानंतर शिक्षिकेने कोणती अट असे विचारले असता, व्यवस्थापकाने गालाकडे बोट दाखवत किस करण्याची मागणी केली. तसेच फक्त एक किस करा आणि हजेरीची चिंता संपवा असेही म्हटले. व्यवस्थापकाच्या या बोलण्यावर शिक्षिकेने स्पष्ट नकार देत, अशा अश्लील अटी मान्य होणार नसल्याचे सांगितले. महिला शिक्षिकेने व्यवस्थापकांचा व्यभिचारी प्रकार समोर आणण्यासाठीच हा व्हिडीओ केला असल्याचे म्हटले जात आहे.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |