महारुद्र नगर येथील महिलांचे नगर परिषद प्रशासनाविरुद्ध रौद्ररूप
विविध समस्या संदर्भात निवेदन देत आंदोलनाचा इशारा
तालुका प्रतिनिधी :- प्रकाश रंगारी
चांदुर रेल्वे नगरपरिषद अंतर्गत येणारे महारुद्र नगर येथील रहिवासी महिलांनी महारुद्र नगर मध्ये विविध समस्या असून रस्ते, चिखल ,पावसाचे पाणी जमा यापासुन शाळेतील विद्यार्थ्यांना होणारा त्रास येथील स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास या सर्व समस्यांचा पाढा वाचत निवेदन देण्यात आले
तसेच स्ट्रीट लाईट ,नाली,गढुळ पाणी यासंदर्भात गंभीर आजार पसरण्याची भीती असून विविध समस्या घेत आज निवेदन देण्यात आले तसेच समाजसेवक पप्पू भालेराव यांच्या नेतृत्वात आज असंख्य महिला नगरपरिषदेवर आपले रौद्र रूप धारण करून सर्वांना धारेवर धरले महारुद्र नगर येथे पिण्याच्या पाण्याची नळ योजनेची व्यवस्था नसून त्या संदर्भात सुद्धा प्रभारी कार्यालयीन अधीक्षक राहुल इंगळे यांच्याकडे समस्या मांडल्या
नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या महारुद्र मध्ये पावसाच्या पाण्यामुळे निवासी महारुद्र नगर येथील महिला शाळेचे विद्यार्थी यांना खूप त्रास होत असून या त्रासाला सामोरे जावे लागत आहे तसेच चिखलाने भरलेल्या रस्त्याने महिलांना विद्यार्थ्यांना जाणे येणे करणे खूप कठीण जात आहे तसेच दुचाकी वाहने नेणारे लोकं सुद्धा त्या रस्त्याने आपला तोल सांभाळू शकत नाही आणि त्यांना सुद्धा तिथे आपल्या जीव मुठीत घेऊन जाणे येणे करावे लागत आहे तसेच यामुळे कपडे पण खराब होत आहे
अशा रस्त्यांनी तत्काळ मध्ये मुरूम टाकून रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी असे निवेदनात सांगण्यात आले आहे तसेच साचलेले खराब पाणी त्याला मार्ग देऊन काढून देण्यात यावे जेणेकरून कुठले पद्धतीच्या आजार पसरणार नाही या संदर्भात चर्चा करण्यात आली तसेच फवारणी करण्यात यावी खंब्यांवर स्ट्रीट लाईट लावून देण्यात यावे या सुद्धा गोष्टीची मागणी करण्यात आली मुख्याधिकारी गैरहजर असल्यामुळे कार्यालयीन निरीक्षक राहुल इंगळे यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना सोबत युवा समाजसेवक पप्पू भालेराव यांच्या नेतृत्वामध्ये संध्या ठाकूर शितल ठाकूर मंगलागुलर मनीषा राठोड वैशाली चौधरी मनीषा सव्वा लाखे वनिता झेले वैशाली विश्वास मंदावाक वंदना गुरुदेव राणी यावले रेखा मुलतानी सुजाता महाजन अशा अनेक महिलांची उपस्थिती होती