जवाहर विद्यार्थी गृहा तर्फे गुणवंत विद्यार्थीचा भव्य सत्कार
नागपूर / प्रतिनिधी
संस्थे तर्फ तेली समाजातील १०वी १२ वी परीक्षेत मेरीट आलेल्या गुणवंत विद्यार्थीचा तसेच पीएचडी पदवीधरांचा आणी संस्थेच्या आजीवन ज्येष्ठ सभासदांचा नुकताच सत्कार सोहळा सिव्हिल लाईन नागपूर येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख आतिथी म्हणुन *श्री संजय पाटील अतिः पोलीस आयुक्त नागपूर* उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष *श्री रमेशजी गिरडे* होते. या प्रसगी *श्री शेखरजी सावरबांधे, कृष्णाजी बेले ,प्रा. रमेशजी पिसे डॉ. संजय ढोबळे, इजी. शंकररावजी लांजेवार, श्री अजय भाऊ धोपटे सुनील मानापुरे रमेश रोकडे र्य येनुरकर, किशोरजी वरंभे अॉड. वाडीभस्मे गजानन तळवेकर , गजानन चकोले* ,प्रामुख्याने उपस्थित होते , समाजबांधव व भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सर्व प्रथम *श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज व स्व., माकडे गुरुजी* यांच्या स्मृतीला माल्याअर्पण करण्यात आले., पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन,संताजींच्या फोटोला पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले., *त्यानंतर कु. मृणाल हिने स्वागत गीत गायले. ८,व्या वर्गाची भवनस शाळेची विद्यार्थिनी मृणाल संजीव तेलरांधे तिने स्वतः लिहिलेले मॉरेल स्टोरीज पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले*. विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्यांचा क्रीडा, क्षेत्रातील विद्यार्थिनींचा, मेरिट पीएचडी पदवीधाराकांचा व जेष्ठ सभासदांचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थी पालकांना समायोचीत , मार्गदर्शन केले.*कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे सचिव श्री शंकर रावजी भुते यांनी केले.*आभार प्रदर्शन श्री मंगेश घवघवे यांनी केले कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता गुलाबराव जुननकर मिलिंद माकडे, शेषरावजी सावरकर, ं दामोदर सातपुते, प्रदीप लाखे,प्रमोद महाजन, प्रशांत पाहुणे, पंढरीनाथ ढोबळे, आदी परिश्रम घेतले.*