रूई छत्रपती येथील माजी सैनिकाने पुर्ण केली पुणे ते पंढरपूर सायकल वारी .
रूई छत्रपती येथील माजी सैनिकाने पुर्ण केली पुणे ते पंढरपूर सायकल वारी .
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – शिवजयंती उत्सव समिती वस्तू व पुणे येथील सेवा कर कार्यालय यांच्यातर्फे पुणे ते पंढरपूर सायकल वारी चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या सायकली वारीमध्ये २७ सायकल पट्टू व ७ स्वयंसेवक सामील झाले होते. त्यामध्ये पारनेर तालुक्यातील रूई छत्रपती येथील माजी सैनिक राजू बबन मेहेत्रे यांनी ही सहभाग घेतला . यापूर्वीही त्यांनी पुणे ते शिवनेरी सहित अनेक ठिकाणी सायकल वरून प्रवास केला आहे. प्रदूषण मुक्तीसह पर्यावरण संवर्धन व शारीरिक तंदुरुस्तीसाठी नियमित सायकल चालविण्यासाठी अनेक तरुणांना प्रेरित केले आहे.
तुझ्या कालचक्रातील कराया आषाढी वारी घेऊनी द्वीचक्री निघाली आमची स्वारी, सायकलवारीचे मुख्य नियोजक राज्यकर सह आयुक्त अमित शेंदारकर यांनी सायकल वारीचे सूबद्ध नियोजन केले होते. सोबत राज्यकर निरीक्षक प्रदीप गांगर्डे यांनी सर्व सायकल पटूंकडून सायकल वारी पूर्वी तयारी करून घेतली व वेळोवेळी प्रवासादरम्यान सूचना दिल्या. शनिवार दि ३ रोजी पहाटे ४ . ३० वाजता निघालेले सायकल पट्टू ताशी २० किलोमीटर वेगाने संध्याकाळी ७ वा. २२o कि . मी . अंतर पार करून पंढरपुर येथे सुखरूप पोहोचले. प्रवासादरम्यान रिमझिम पाऊस, ऊन व जोरदार वाऱ्याचा सामना करत, कधी सायकलचा बिघाड, तर कधी रस्त्यावरील चढउताराला न जुमानता विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या या धावपटूंनी एकाच दिवसात ही सायकल वारी पूर्ण केली.
संध्याकाळी चंद्रभागेतील भक्त पुंडलिक मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या हरीच्या दर्शनाने प्रवासादरम्यान झालेल्या सर्व वेदना नाहीशा झाल्या. आनंदी जीव झाला दर्शनाने पंढरीच्या द्वारी , हरी कृपेने झाली पुर्ण ही सायकल वारी . सकाळी भक्त निवास परिसरात ‘ हरित पंढरी स्वच्छ पंढरी ‘ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करून स्वच्छता मोहीम राबवली.
पारनेर तालुक्यात माजी सैनिक असलेले राजू बबन मेहेत्रे यांच्या या सायकल वारीचे विशेष कौतूक होत आहे . त्यांच्या या धाडस व छंदाचे दैनिक पारनेर समर्थ परिवार व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघा ने कौतूक करून शुभेच्छा दिल्या आहेत . ]