बाभुळवाडे च्या केदारेश्वर मंदिरात १ ल्या सोमवारी भाविकांची मांदीयाळी .
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – राज्यात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाभुळवाडे येथील श्री केदारेश्वर मंदिरात दि ५ रोजी असलेल्या पहिल्या सोमवारच्या निमित्ताने दर्शनासाठी भाविकांची मांदिआळी झाली .
सोमवार दि ५ रोजी बाभूळवाडे येथील केदारेश्वर सेवाभावी ट्रस्ट व समस्त बाभूळवाडे ग्रामस्थ यांच्या वतीने गावातील ग्रामदैवत स्वयंभू श्री केदारेश्वर डोंगरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी च्या श्रावण मासात ५ सोमवार आले असून श्रावण मासाची सुरुवात व शेवट ही सोमवार ने होत आहे . हा योगायोग तब्बल ७१ वर्षानंतर आला आहे. केदारेश्वर सेवाभावी ट्रस्ट गेल्या १३ वर्षांपासून विविध विकास कामे करत आहे. ट्रस्टमार्फत होत असलेल्या कामांमुळे अनेक भाविक व दानशूर व्यक्ती प्रभावित होत असून देवस्थानला सढळ हाताने मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. याच अनुषंगाने गावातीलच पाठक कुटुंबीयांतील रेणुका व आदित्य पाठक यांनी दिवंगत जगन्नाथ पाठक गुरुजी यांच्या स्मरणार्थ केदारेश्वर डोंगरावर १३ फुटी भव्य असे केदारेश्वरांचे ध्यानस्थ शिल्प उभे केले आहे. गारगुंडी येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील शंकर फापाळे यांनी दिवंगत आई-वडील शंकर आनंदा फापाळे व शांताबाई शंकर फापाळे यांच्या स्मरणार्थ मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार व दोन्ही शिव मंदिरांच्या प्रवेशद्वारावर डिजिटल नाम फलक व येणाऱ्या भाविकांसाठी शुद्ध ,थंड पाण्याचे सयंत्र याची व्यवस्था उभी केली आहे. तसेच हत्तलखिंडी येथील भाविक भक्त सुभाष गायकवाड व सौ साधनाताई यांनी दिवंगत सत्यभामा जगदाळे यांच्या स्मरणार्थ भव्य असे रंगीत पाण्याचे कारंजे उभे करण्यासाठी आर्थिक सहयोग दिला आहे.
प्रथम श्रावणी सोमवारचे औचित्य साधून या सर्व थोर देणगीदारांचा, सोमवारच्या अन्नदात्यांचा व दानशूर व्यक्तिमत्त्वांचा केदारेश्वर सेवाभावी ट्रस्ट व बाभूळवाडे ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी केदारेश्वर सेवाभावी ट्रस्टचे सर्व विश्वस्त, ग्रामपंचायत सरपंच सौ वैशाली जगदाळे व सर्व सदस्य विकास सोसायटी चेअरमन जयसिंग खणकर व सर्व सदस्य, केदारेश्वर पतसंस्था व रामलिंग पतसंस्थांचे सर्व कर्मचारी, सर्व जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक व विद्यार्थी , केदारेश्वर हायस्कूलचे सर्व शिक्षक व विद्यार्थी, भाजप कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे, निलेश लंके प्रतिष्ठानचे अनिल गंधाक्ते, खा . निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक संदीप चौधरी, महेंद्र गायकवाड , ग्राहक पंचायत चे विलास जगदाळे, हरिश्चंद्र पोटे, कचर खणकर, अनंथा मातेरे, सचिव भिकाजी जगदाळे सर, प्रमोद जगदाळे , संजय शिर्के सर, पांडुरंग पवार सर, निवृत्ती जगदाळे, भाऊ खोडदे, सोपान जगदाळे, सुभाष जगदाळे, सविता जगदाळे, लक्ष्मीबाई बोरुडे, प्रमोद जगदाळे सर्व थोर देणगीदार मंडळी व बाभूळवाडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व भाविकांसाठी जगदाळे वाडा व पिराणी वस्ती कडून खिचडी प्रसाद व सायंकाळी सोमवारचे अन्नदाते ज्ञानदेव चौगुले व परिवाराकडून लापशी-भात-आमटीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.