सामाजिक

मासे पकडण्यासाठी गेलेले नागरिक पुराच्या पाण्यात. अडकले

Spread the love

नाशिक / नवप्रहार डेस्क

                    पावसाळ्याच्या दिवसात पर्यटन स्थळावर जाताना काळजी घेण्याचा सल्ला प्रशासनाकडून नेहमीच दिला जातो. पण नैसर्गिक ठिकाणी गेल्यावर लोक काळजी घेत नाही . आणि संकटात फसतात. अशीच घटना जिल्ह्यातील मालेगाव येथील गिरणा नदीपात्रात घडला आहे. मासे पकडण्यासाठी १२ ते १५ जण गिरणा नदीच्या पात्रात उतरले. पण, काही वेळातच पाणी पातळीत मोठी वाढ झाली. मध्योमध असलेल्या खडकावर त्यांनी आश्रय घेतला.

सगळीकडून पाणी वाढत असताना देवाचा धावा करत त्यांनी रात्र काढली. अखेर सोमवारी (5 ऑगस्ट) सकाळी त्यांना लष्कराच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले.

उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाल्याने नद्या-नाले वाहू लागले आहेत. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशात मालेगाव येथे १२ ते १५ गिरणा नदीमध्ये मासे पकडायला गेले. सगळे रविवारी (4 ऑगस्ट) दुपारी नदीपात्रात उतरले. मासे पकडत असतानाच अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली.

रात्रभर गिरणा नदीत मुक्काम

अचानक पाणी वाढल्याने सगळे गिरणा नदीच्या पात्रात मधोमध असलेल्या उंच खडकावर गेले. तोपर्यंत पाण्याने खडकाला सगळीकडून वेढा दिला. पाणी वाढल्याने कुणाचीही काठापर्यंत येण्याची हिंमत होत नव्हती.

15 नदी अडकल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्यातातडीने यांची माहिती पोलीस आणि प्रशासनाला दिली. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफच्या पथकाला बोलवण्यात आले.

पाणी वाढल्याने काढणे झाले अशक्य

नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने त्यांना दोराच्या मदतीने बाहेर काढणे अवघड झाले. त्यामुळे रात्रभर ते कडकावरच बसून होते. पाणीपातळी वाढ, पाण्याचा वेग जास्त आणि गडद अंधार असल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आले.

 

 

 

 

लष्कराचे हेलिकॉप्टर आले अन् झाली सुटका

गिरणा नदीच्या पाणीपातळी वाढ झाल्याने १५ जणांच्या सुटकेसाठी अखेरीस हेलिकॉप्टर बोलावण्यात आले. लष्कराचे हेलिकॉप्टर आल्यानंतर अडकलेल्या १५ जणांना गिरणा नदीतून बाहेर काढण्यात आले. नदीच्या काठावर उतरल्यानंतर सगळ्यांनी मृत्यूच्या दाढेतून सुटल्याने निश्वास टाकला.

सुदैवाने पाणी पातळी वाढली नाही

१५ जण अडकले तेव्हा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. पण, रात्रभर सुदैवाने नदीचे पाणी वाढले नाही. त्यामुळे खडकावर त्यांना आश्रय घेता आला. नदीच्या पाण्यात आणखी वाढ झाली असती, तर सगळे पुरात वाहून गेले असते आणि अनर्थ घडला असता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close