क्राइम

भर रस्त्यावर पत्नीवर ब्लेडने सपासप बार ,हे आहे कारण 

Spread the love

गिरगाव ( मुंबई ) / नवप्रहार डेस्क

        पत्नी रागावून माहेरी गेल्यावर तिला फोन करून बोलावले असता ती न आल्याने रागावलेल्या पतीने तिला रस्त्यात पकडुन तिच्या मानेवर ब्लेडने वर केले. नंतर स्वतः च्या मनगटावर वर करून स्वतःला जखमी केले. यात दोघेही जखमी झाले असून दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.  ही घटना सोमवारी सकाळी गिरगावच्या खाडिलकर मार्गावर घडली.

हलल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव शीतल चव्हाण(३०) आहे. तिचा सागर बेलोसे(३२) यांच्यासोबत विवाह झाला होता. दोघांना १० वर्षांचा मुलगा आहे. हे दाम्पत्य विरार येथे राहते. तर शीतल गिरगावच्या खाडिलकर मार्गावरील एका खासगी कंपनीत कारकून म्हणून नोकरी करते.

अलीकडे शीतल, सागर यांच्या वैवाहिक आयुष्यात वाद सुरू झाले. गेल्या एक महिन्यापासून शीतल आपल्या माहेरी राहते. तर सागर तिला घरी येण्यास बजावत होता. याच वादातून सागरने शीतलचा विरार येथून पाठलाग केला. सकाळी त्याने खडीलकर मार्गावर शीतल लां अडवून तिच्या मानेवर ब्लेड ने सपासप वार केले. त्यानंतर तेच ब्लेड स्वतःच्या मनगटावरून फिरवले.

भररस्त्यात ही घटना घडल्याने रस्त्यावर उपस्थित गर्दी घाबरली. मात्र गर्दीतील काहींनी दोघांना रुग्णालयात नेले. तर काहींनी पोलिसांना कळवले.

दोघांचे जबाब नोंदवण्यात आले असून या प्रकरणींसगर याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे व्ही. पी. रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किशोर कुमार शिंदे यांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close