आठवड्यापासून पावसाची रिपरिप पिकांची वाढ खुंटली
शेतकरी,बांधवावर चिंतेचे सावट
प्रतिनिधी…आर्वी
आठ दिवसापासुन आर्वी तालुक्यात सातत्याने रिमझिम पाऊस सुरू असल्याने आठवडाभरापासून सुर्यदर्शनच झालेच नाही. त्यामुळे शेतातील पिकांना सूर्यप्रकाश मिळाला नाहीत. तसेच पिकांची निंदण,खुरपणी, मशागत, डवरणी बंद पडल्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर,इत्यादी पिके आता पिवळी पडत असुन पिकावर रोगराईची भिती निर्माण झाली आहे..
गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या रिपरिप पावसाने पिकांची सूर्यप्रकाशाअभावी वाढ खुंटली आहे. अशा परिस्थिती मध्ये पिकांना सुर्यप्रकाशाची नितांत आवश्यकता आहे. मात्र तब्बल आठ दिवसापासून वर्धा. जिल्ह्यात सूर्यदर्शन न झाल्यामुळे पिकांची वाढ खूटुंन परिस्थिती हलाखीची झाली आहे. सततच्या रिमझिम पावसामुळे मोठ्या प्रमाणात तण वाढले असुन, शेतीचा लागवड खर्च मजूर मिळत. नसल्याने प्रचंड वाढला आहे.
..त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडली आहे. ढगाळ व आभ्राच्छित वातावरणामुळे शेतीतील पिकासह,आता नागरिकांनाही जलजन्य आजारांचा सामना करावा लागत आहेत. एकीकडे सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला असुन आठ दिवसापासून निर्माण झालेल्या प्रतिकूल नैसर्गिक वातावरणामुळे नागरिकांना सर्दी, हिवताप, मलेरिया, डेंग्यू सदुश्य तापांच्या आजाराने सामोरे जावे लागत असुन ग्रामीण. व शहरी भागातील रुग्णालये ,रुग्णांनी भरले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या,तब्येतीची काळजी. घ्यावी, असे वैद्यकीय. तंज्ञानी सल्ला. दिला आहेत.
माझे शेतात मी सोयाबीन व कपाशी लावली आहेत, परंतु. दहा दिवसापासून पाऊसाने थैमान घातल्याने मला शेतावर कोणतेही काम करता,आले नाहीत. सततच्या पाऊसाने मला. निंदण करण्यासाठी मजुर मिळाले नाही. सततच्या पाऊसामुळे सोयाबीनच्या पानावर पिवळपटपणा आला आहेत.
*प्रमोद कहारे*
शेतकरी आर्वीनिसर्गाच्या लहरीपणामुळे आमच्या पिकाला फटका बसल्याने शेतातील पिकांची नैसर्गिक वाढ खुंटली आहेत. खुरपणी व डवरणी बंद असल्याने पिकांचे नुकसान होत आहेत.
*अनुप जैसिंगपुरे*
शेतकरी आर्वी
माझे शेत तळेगाव रोडवर असुन त्यामध्ये मी कपाशी व तूर, सोयाबीन लावले आहेत. परंतु सततच्या पाऊसाने, आमच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव होत आहेत. अस्मानी व.सुलतानी प्रकोपामुळे पिके धोक्यात आली आहेत. शासनाने आम्हाला मदत. करून, शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
असे मला वाटते.
*राजू नखाते*
शेतकरी आर्वी.
…………………