मैत्रिणीशी मस्करी करणे आले अंगलट ; पोलिसांनी मैत्रिणीला केली अटक


सातारा / नवप्रहार डेस्क
सोशल मीडियावर तरुणाच्या नावाने बनावट खाते उघडून मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिला मित्र बनवणे. तिच्याशी चाट करणे आणि प्रेमात पडलेल्या मैत्रिणीने भेटण्याची इच्छा दाखविल्यावर सबंधित तरुण मेला आहे हे भासविण्यासाठी पुन्हा मृतक तरुणाच्या वडिलांच्या नावाने बनावटी खाते तयार करणे तरुणीच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात तरुणीला अटक केली आहे. ही घटना साताऱ्यातील वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत (ता. कोरेगाव) उघड झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सायली ( काल्पनिक नाव) आणि रोशनी ( काल्पनिक नाव) या चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या वेगवेगळ्या गावात राहत होत्या. मस्करी पोटी रोशनी ने मनीष या बनावट नावाने इंस्टा वर खाते उघडुन सायली ला फ्रेंड केले. यानंतर त्यांच्या दोघात चॅटिंग सुरू झाले. त्यामुळे सायली तथाकथित मनीष च्या प्रेमात पडली.
सायली ने मनीष कडे भेटण्याची ईच्छा दर्शवली. त्यामुळे रोशनी ची पंचाईत झाली. काही दिवस बनावटी मनीष ने सायली ल टाळाटाळ केली. पण सायली जास्त मागे लागल्याने पंचाईत झालेल्या रोशनी ने पुन्हा शिवम पाटील या नावाने बनावटी खाते उघडून ते मनीष चे वडील आहेत असे भासवले.
सायली क्या खात्यावर त्यांनी मनीष चा मृत्यू झाल्याचा मॅसेज पाठवला. सायली ला विश्वास यावा म्हणून रोशनी ने दवाखान्यातील तरुणाचे फोटो सुद्धा पाठवले. यामुळे मनस्वी खचलेल्या सायली ने गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
या घटनेची नोंद वाठार पोलीस ठाण्यात अकस्मात निधन म्हणून झाली होती. या सर्व प्रकारास कारणीभूत ठरलेल्या संशयित युवतीला आता पोलिसांनी अटक केली आहे.
सातारा सायबर पोलीस व सायबर तज्ज्ञ जय गायकवाड यांनी ‘इन्स्टाग्राम’वरून या संदर्भातील माहिती मागवली. त्यातूनच हा धक्कादायक प्रकार उघड झाला. या सर्व प्रकारास कारणीभूत ठरलेल्या संशयित युवतीला पोलिसांनी अटक केली.
पोलीस अधीक्षक समीर शेख , अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने, उपनिरीक्षक सातव, भोसले, पोलीस कर्मचारी चव्हाण, देशमुख , इथापे यांच्यासह सातारा ‘सायबर टीम’ने ही घटना उघडकीस आणली.