क्राइम

पंचायत चां तालिबानी आदेश : पत्नी सोबत गावासमोर करायला लावले असे कृत्य 

Spread the love

प्रतिनिधी/ लखनऊ 

कामाच्या निमित्ताने पती-पत्नी एकमेकांपासून दूर राहतात. बहुतेक लोक आपल्या कुटुंबापासून दूर मुंबईत कामाला येतात. कधीतरी आपल्याला कुटुंबाला भेटायला घरी जातात.

अशीच एक व्यक्ती जी मुंबईत राहत होती. ती आपल्या घरी परतली. घरी गेल्यानंतर या व्यक्तीने त्याच्या बायकोसोबत सर्वांसमोर असं कृत्य केलं की सर्वांना धक्का बसला. नवरा बायकोसोबत ते कृत्य करताना संपूर्ण गाव पाहत होतं. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधील इब्राहिमपूर गावातील हे प्रकरण आहे. महिलांनी खचाखच भरलेल्या मेळाव्यात असं काही घडलं आहे की कुणी विचारही केला नसेल. मेळाव्यात पतीनं पत्नीसोबत नको तेच कृत्य केलं. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

पतीनं पत्नीसोहत काय केलं?

पतीनं पत्नीला झाडाला बांधलं, तिच्या तोंडाला काळं फासलं आणि नंतर तिचे केस कापले. इतक्यावर तो थांबला नाही तर त्याने तिला चपलेचा हारही घातला. पतीनं पत्नीसोबत हे सर्व केलं ते पंचायतीच्या आदेशावरून. पंचायतीच्या तालिबानी शिक्षेचं प्रकरण समोर आले आहे. पंचायतीच्या या आदेशामुळे गावात तणावाचं वातावरण पसरलं आहे.

महिलेसोबत असं का केलं?

गावातील तरुण लवकुशसोबत अवैध संबंध ठेवल्यामुळे पत्नीला तालिबानी शिक्षा दिल्याचा आरोप पतीने केला आहे. महिलेचे त्याच गावात राहणारा लवकुश नावाच्या तरुणावर प्रेम होतं. विवाहित महिलेलादेखील तीन मुले आहेत, तिचा मोठा मुलगा 12 वर्षांचा आहे. महिलेचा पती हरिलाल हा मुंबईत खासगी नोकरीला आहे. पत्नीचे त्याच गावातील एका मुलासोबत अनैतिक संबंध असल्याचा पतीला संशय होता. पती मुंबईहून परतल्यावर त्याने महिला आणि तिच्या प्रियकराला बोलताना पकडल्याचं सांगण्यात येत आहे.

त्यानंतर गावची पंचायत झाली. या प्रेमीयुगुलाला तालिबानी शिक्षा देण्यात आली होती. मात्र प्रियकराने पंचायतीच्या तावडीतून निसटून पोलीस ठाणं गाठलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथं दाखल झाले. पण पोलीस येणाऱ्यापूर्वीच महिलेचं तोंड काळं करून तिचे केस कापण्यात आले होते.

पोलिसांनी दाखल केला गुन्हा

पोलिसांनी 22 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पती हरिलालसह 15 जणांना अटक केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय रॉय यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. गावात तणावाचे वातावरण पाहता पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close