शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त मिष्ठान्न वाटप
अंजनगाव सुर्जी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण सप्ताह समुदाय सहभाग दिवस अंतर्गत पंचफुलाबाई हरणे विद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या सामुयिक स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते.यामध्ये महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री,शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन शालेय विद्यार्थ्यांना जिलेबी चे वाटप युवासेना शहरप्रमुख अक्षय गवळी यांच्या तर्फे करण्यात आले. सदर कार्यक्रम शिवसेना-युवासेना वतीने युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई, पश्चिम विदर्भ सचिव सागरजी देशमुख, अमरावती विस्तारक कामेशजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. यावेळी शिवसेना-युवासेना-महिलाआघाडी-शिवसहकार सेना पदाधिकारी व शिवसैनिक तसेच विद्यालयचे प्राचार्य,शिक्षक-शिक्षिका- कर्मचारी उपस्थित होते.