पत्नी ने प्रेम प्रकरणातून केली पतिची हत्या
घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथिल घटना
घाटंजी ता प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
आज दि. २६/०७/२०२४ रोजी घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथे पत्नी व प्रियकराने संगनमत करून आपल्या प्रेमास अडथळा ठरणाऱ्या पतीची नामें प्रभाकर मारवाडी यांची हत्या केल्याचे उघड झाले.
सविस्तर वृत्त- दी. 26/7/24 रोजी फिर्यादी नामे सुधाकर कवडुजी मारवाडी वय ४६ वर्ष, रा. राजुरवाडी यांनी तक्रार दिली की, दि. २५/०७/२०२४ चे २०:०० वा. ते दि.२६/०७/२०२४ चे ०४:०० वा. चे दरम्याण त्यांची भाव सुन नामे. सौ. जयश्री प्रभाकर मारवाडी, वय २८ वर्ष, रा. राजुरवाडी हीने तीचे प्रीयकर नामे सुरज सुनिल रोहनकर, वय २८ वर्ष, रा. समता नगर, वरूड, जि. वर्धा याचे सोबत संगणमत करून त्यांचा भाउ नामे प्रभाकर कवडुजी मारवाडी, वय ४२ वर्ष, रा. राजुरवाडी याला अनैतिक संबंधातुन तोंड दाबुन जिवानीशी ठार मारले व त्याचे प्रेत गावाचे बाहेर चायरे यांचे शेताचे परीसरात रोडचे काठावर फेकुन दिले. अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्टवरून पो. स्टे. ला अप. क. ६३१/२४ कलम १०३, ३ (५) भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा नोंद करून प्रकरणाची गंभिरता लक्षात घेता घाटंजी पोलिस निरीक्षक सूरडकर सह टीम ने तपास केला असता सदर प्रकरणाच गुढ समोर आले. नमुद गुन्ह्याचे तपसात यातील आरोपी नामे जयश्री प्रभाकर मारवाडी हीला ताब्यात घेवुन गुन्ह्या संबंधाने विचारपुस केली असता तीने कबुली दिली की, प्रीयकर सुरज रोहनकर, वय २८ वर्ष, रा. समता नगर, वरूड जि. वर्धा याचे सोबत मागील २ वर्षापासुन तीचे प्रेम संबंध असुन यातील मृतक तीचा पती प्रभाकर कवडुजी मारवाडी हा त्यांच्यात आडकाठी होत असल्याने तीने तीचा प्रीयकर सुरज रोहनकर याचें सोबत संगणमत करून दि. २५/०७/२०२४ रोजी रात्री दरम्याण ते राहत असलेलया घरामध्ये पतीचा तोंड दाबुन जिवानीशी ठार केले. त्यावरून यातील आरोपी नामे सुरज सुनिल रोहनकर, वय २९ वर्ष, रा. समता नगर, वरूड जि. वर्धा यास वरूड येथुन ताब्यात घेतले आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक साहेब, यवतमाळ, मा. अपर पोलीस अधिक्षक साहेब, यवतमाळ, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, पांढरकवडा यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. ज्ञानोबा देवकते, स्था.गु.शा. यवतमाळ,घाटंजी ठाणेदार निलेश सुरडकर, पोउपनि/नागरगोजे, सपोनि/अजयकुमार वाढवे, पोउपनि/धनराज हाके, पोहवा/१६७८ सुनिल खंडागळे, पोहवा!/१३६१ योगेश डगवार, पोना/२३१४ सुधिर पीतुरकर, पोकॉ/२४९७ रजनिकांत मडावी, चालक पोहवा/१२२० नरेश राउत स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व पोहवा/१७५६ दिनेश जाधव, पोहवा/२२०५ अमोल कोवे, महीला पोहवा/१९४५ मेघाली खुपसे, पोका/२४४३ संदीप गोहने, पोकों/२५५० अमीत लोखंडे सह यांनी केली.वृत्त लिहण्या पर्यंत कार्यवाहीत आरोपीचे मेडीकल चाचणी चालू होती.
000000000000000000