शाशकीय

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांच्या आदेशाला दिला खो

Spread the love

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकोट हे चौकशी अहवाल दाखल करण्यास करीत आहेत टाळाटाळ
अकोट प्रतिनिधी :– अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथील शेतकरी रमेश रामचंद्र खिरकर यांनी दि.18/1/2024 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांचेकडे सावकार विजयकुमार गोपालदास चांडक व सरिता विजयकुमार चांडक यांचे विरुद्धड लेखी तक्रार सादर केली होती.त्या तक्रार अर्जाची तात्काळ दखल घेऊन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांनी दि.30/1/2024 रोजी सहाय्यक निंबधक सहकारी संस्था अकोट यांना लेखी पत्र दिले व सदर प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करून चौकशी अहवाल 30 दिवसाचे आत सादर करण्या बाबत कळविले होते.सहायक निंबधक सहकारी संस्था अकोट यांनी प्रकरण दाखल करून सुरू केले.शेतकरी व सावकार यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली,दोन्ही पार्टीचे वकील पत्र सादर झाले,अर्जदार यांनी चारही धुर्याच्या बाजूचे शेतकरी यांचे 100 रुपये स्टॅम्पपेपर वर पुरावे सादर केले.व सर्व शेतीचे कागडेपत्र दाखल केले.शेतकरी रमेश रामचंद्र खिरकर यांचाच ताबा असल्या बाबतचे स्पॉट पंचनामा मंडळ अधिकारी अकोलखेड यांनी सादर केला.आज रोजी शेत शेतकरी यांच्याच ताब्यात आहे.मात्र तेवढ्यात सहायक निंबधक सहकारी संस्था विटनकर मॅडम अकोट यांची बदली झाली होती.त्यांच्या जागेवर आता अनिल शात्री हे रुजू झाले आहेत.तरी सुद्धा सदर प्रकरणाची दखल घेऊन आज परंत प्रकरणात चौकशी अहवाल सादर करण्यात आलेला नाही.आता दि.1/8/2024 ही तारीख देण्यात आली आहे.तरी या तारखेला सहायक निंबधक सहकारी संस्था अकोट हे कुठला अहवाल दाखल करतात की पुन्हा तारीख पे तारीख देऊन चौकशी अहवाल दाखल करण्यास टाळाटाळ करतात याकडे शेतकरी रमेश रामचंद्र खिरकर यांचे लक्ष लागले आहे.

मी माझ्या ताब्यात असलेल्या शेतीचे कागदपत्रे पूर्ण दाखल केले.साक्षदार यांचे 100 रुपयेचे स्टॅम्पवर रोटरी करून पुरावे सादर केले.तरी आज परंत अहवाल न पाठवत मला तारीख पे तारीख देण्यात येत आहे.तरी सहायक निबंधक अकोट यांनी अहवाल दाखल करावा
रमेश रामचंद्र खिरकर शेतकरी बोर्डी

सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे.चौकशी पूर्ण होताच सदर प्रकरणात अहवाल पाठवण्यात येईल
रवी शास्त्री
सहायक निंबधक सहकारी संस्था आकोट

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close