महसूल कर्मचारी संपावर, नागरिकांची तहसीलीतील कामे रखडली
तात्काळ तोडगा काढावा शेतकरी पुत्रांचे तहसील कार्यालय जाफराबाद यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन .
जाफराबाद / प्रतिमिधी
विविध मागण्यासाठी सुरू असलेले महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे सुरूच आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी,महिला व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारे कागदपत्र कर्मचाऱ्यांचा संपामुळे अडकून पडले आहे.
सध्या लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी सुरू आहे. या योजनेसाठी लागणारे उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला लागतात पण,हे महसूल कर्मचारी संपामुळे ते बंद आहे .त्याचबरोबर सध्या विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये,अभियांत्रिकी, वैद्यकीय,विधी,पदवी अशा प्रवेशासाठी उत्पन्न,रहिवाशी,राष्ट्रीयत्व अशा महत्त्वाचे दाखले लागतात हे दाखले वेळेवर न मिळाल्यास यांना प्रवेशासाठी समोर अडचण येऊ शकते.शेतकरी पुत्रांच्या वतीने, तहसील कार्यालय जाफराबाद यांच्या मार्फत मा. जिल्हाधिकारी जालना यांना निवेदनसादर करण्यात आले . आपण तात्काळ वरिष्ठांची चर्चा करुन या संपावर तोडगा काढावा. व सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,महिला व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबावे ही मागणी करण्यात आली यावेळी सुनील फदाट,हर्षल फदाट(बापु), गोपाल बराटे, मधुकर जाधव,अनंता घोडके, फकिरबा जोशी,दिपक फदाट यांची उपस्थिती होती.