विदेश

24 वर्षीय तरुणीचा मृत्यू ; पीएम मध्ये धक्कादायक खुलासा 

Spread the love

               सोशल मीडियावर अन्य व्हिडीओ सोबत खाबूगिर लोकांचे ( फुडी ) व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात असले फुडी लोक खाण्याचे चॅलेंज स्वीकारून ती स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करतात. अश्यच एका स्पर्धेत 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. तिच्या शवविच्छेदन अहवालात हे कारण समोर आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू असताना घडली. ही तरूणी तब्बल 10 तास सतत अन्न खात राहिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती इतकी खालावली की त्यांचा जागीच मृत्यू झाला.

चीनमधील स्थानिक पोर्टल हनक्यूंगच्या रिपोर्टनुसार, ही दुःखद घटना 14 जुलै रोजी घडली होती. त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, पॅन शियाओटिंग (Xiaoting) नावाची मुलगी फूडी होती आणि ती अनेकदा जास्त अन्न खाण्याचे चॅलेंज स्वीकारत असे. अशा चॅलेंजमध्ये 10 तासांपेक्षा जास्त वेळ सतत खाणे याचा देखील समावेश होता.

Creaders.com या स्थानिक चीनी पोर्टलनुसार, Xiaoting एका वेळी 10 किलो अन्न खात असे. तिने असं करू नये यासाठी तिचे आई-वडिलांनी आणि मित्र असा सल्ला देत असत. पण, तिने असे चॅलेंज घेणे थांबवले नाही. अशाच एका घटनेत अति खाल्ल्याने अखेर तिचा मृत्यू झाला.

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उलगडलं रहस्य

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये Xiaoting मृत्यूचे रहस्य उघड झाले आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की तिचे पोट खूप फुगले होते आणि त्यात पूर्णपणे न पचलेले अन्न आढळले. रिपोर्टमध्ये हेही सांगण्यात आलं की, या मुलीने अन्न चावण्याएवजी ते थेट पोटात ढकलले.

दरम्यान Xiaoting च्या मृत्यूने सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. फूड ब्लॉगर्सच्या अशा चॅलेंज घेण्यावर लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक क्रिएटर्स आहेत जे एका ठराविक वेळात अन्नाचं मोठं ताट संपवण्याचे चॅलेंज स्वीकारतात.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close