राजकिय

राजुरा मतदार संघात अनेकजन लढवण्यास इच्छुक.

Spread the love

 

आगामी विधानसभा निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्या असताना सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. अशातच नेते,पुढारी,आजी- माजी सर्वच विधानसभा मतदार संघात दौरे करतांना नजरेस पडत आहे. यावेळी राजुरा विधानसभा कोणता पक्ष,उमेदवार जागा जिंकतो याबाबत अजून पर्यंत कोणीही दावा केलेला नाही. मात्र, नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी, त्याला जनता एक्सेप्ट उचलून धरू शकते अशी चर्चा जोरात सुरु झाली आहे. राजुरा मतदार संघात कोण्या एका पक्षाला जनाधार नसुन या संघात जनता प्रामाणिक काम करणाऱ्या उमेदवाराच्या शोधात आहे. परंतु दावेदारीच्या समीकरणात तालुक्यात जाणीवपूर्वक तेच ते उमेदवार लादून जागा सोडली जात नाही. असा आरोप राजकीय वर्तुळात देखील होत आहे.नेत्यांकडून जाणीवपूर्वक गट-तट, स्वयम प्रतिष्ठा जोपसण्यात पक्षाला कमकुवत करण्याचे काम केले जात असल्याची बोंब कार्यकर्त्यातून नेहमीच असताना पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार खासदार जरी पक्ष सोडून इकडे तिकडे गुलाट्या मारत असले तरी मतदार मात्र, आज प्रामाणिक आणि कर्त्या माणसाच्या सोबत आहे. राजुरा विधानसभा अनेक जन लढवण्यास इच्छुक आहे, यात ते आपला विजय निश्चित आहे. अशी आशा मनी बाळगून आतापासूनच ते कामाला लागले आहे. राजुरा मतदार संघातील मतदारांच्या भावनेचा आदर कोण राखतं किंबहुना विविध पक्षाची राजुरा विधानसभेची उमेदवारी कोणाच्या पत्यावर पोहचते हे अजून तरी निश्चित नाही.त्याचबरोबर ओल्ड नेत्यांनी जर सन्मानाने राजुरा जागा सोडत नसेल तर आपण किती दिवस फरफट सहन करायची स्थानिक स्वराज्य संस्थेपासुन लोकसभेपर्यंत जिल्ह्यात असलेल्या प्रत्येकाच्या जनधरामुळे किमान ज्यांनी सामाजिक कार्याचा वसा घेतला अशा व्यक्तीला उमेदवारी देऊन राजुरा मतदार संघाला न्याय दिला पाहिजे, परंतु जागा वाटपात किंवा निवडणुकी नंतर मात्र, चांगल्या व्यक्तिमत्वाला कुठेही विचारात घेतले जात नाही. असंही बोलल्या जातं आहे. त्यामुळे सन्मानाने राजुरा विधानसभेची जागा नवनिर्वाचित लोकांना न सोडल्यास हेच ईच्छुक उमेदवार स्वतंत्र लढले पाहिजे. जनता त्यांच्या सोबत असुन राजुरा विधानसभेत त्यांचा विजय कोणीही रोखु शकत नाही. असे वातावरण राजुरा, जिवती, कोरपणा, गोंडपिपरी, तालुक्यात निर्माण झाले असल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत मात्र मनसे, काँग्रेस, भाजप, शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आप, या सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पक्षांकडे उमेदवारी करिता मागणी केली असून बरेच पक्ष युती पक्षात असल्याने कुणाच्या गळ्यात आमदारकीची माळ पडतील हे मात्र येणारी वेळच ठरवणार आहे. हे सर्व पक्षांचे अलबेला असलं तरी शेतकरी संघटनेचे मात्र वामनराव चटप माझं ठरलं या जोमाने राजुरा विधानसभेत प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. मागील निवडणुकीत भाजप पक्षाला मांगे टाकत दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे शेतकरी संघटनेचे उमेदवार अवघ्या 2300 मताने पराभव पत्करावा लागला. काँग्रेस पक्षाचा उमेदवार काही फरकानीच विजय झाले. 2024 मध्ये मात्र पक्ष पक्षातील गटबाजीचे राजकारणामुळे पक्षाचेच नुकसान होणार असल्याचे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे. राजुरा विधानसभेतील मतदार मात्र सुज्ञ आहे. विकास करणाऱ्या जनसामान्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या पक्षपात न करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी मतदार मतदान करणार असल्याचे या निवडणुकीत बोलल्या जात आहे. राजुरा विधानसभेचे आमदार कोण? होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वच पक्षांनी आमदारकीच्या उमेदवारी करिता फिल्डिंग लावत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. यावर्षीची होणारी ही निवडणूक मोठ्या चुरशीची होणार आहे. हे मात्र तेवढच खरे असले तरी निवडणूक जिंकणेही उमेदवाराला यावेळी मोठी कसरत लागणार आहे.

मनोज गोरे कोरपणा

                            मो 9923358970

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close