पारनेर तालुक्यात रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्या , ग्रामस्थ घाबरले .
.
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] -पारनेर तालुक्यात गेले पंधरा दिवसां पासून रात्री १२ ते २ वाजण्याच्या दरम्यान ड्रोन घिरट्या घालत असल्याने ग्रामस्थ घाबरले असून .या अज्ञात ड्रोनचा तपास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे
या ड्रोन च्या संदर्भात पारनेर पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनाही याबाबतची काही माहिती देता आली नाही, ते या ड्रोन बाबत पूर्णपणे अनभिज्ञ दिसून आले . गेल्या पंधरा दिवसापासून बाभूळवाडे, देवीभोयरे ,अळकुटी , म्हस्केवाडी , पाबळ, रेनवडी, शिरापूर , वडनेर , वाजेवाडी व परिसरात मध्यरात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन फिरत असल्याने ग्रामस्थ चोरीच्या भीतीने घाबरले आहेत . हे ड्रोन कोण चालवत आहे व कशासाठी चालवत आहे, याचा नेमका उद्देश माहित होणे, अत्यंत गरजेचे आहे . पण प्रशासन व पोलीस खात्याशी संपर्क साधला असता , त्यांनाही या गोष्टीची कसलीही कल्पना दिसत नसल्याचे दिसून आले .
परिणामी यासंदर्भात कोणाशी संपर्क साधावा , हे ही पारनेर तालुक्यातील ग्रामस्थांना नेमकी समजू शकले नाही . यासंदर्भात पारनेर चे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्याशी संपर्क साधला असता , तेही या ड्रोन बाबत अनभिज्ञ दिसून आले ,त्यांनी या गोष्टीचा तपास करू व माहिती देतो, असे सांगितले . परंतु त्यांनाही याबाबतची माहिती मिळवून आली नाही व त्यांनी या ड्रोनच्या माध्यमातून कुठेही चोऱ्या झालेले नाही व चोरी च्या फक्त अफवा आहेत ,असेही स्पष्टीकरण दिले . या ड्रोनच्या संदर्भात तपास होऊन करून योग्य ती कारवाई करावी ,अशी मागणी ही पारनेर तालुक्यातून होत आहे भविष्यात यदा कदाचित काही गंभीर घटना घडल्यास याला जबाबदार कोण असाही प्रश्न विचारला जात आहे .