सामाजिक

सुसक्षीत बेरोजगारांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप

Spread the love

 

बिलोली (प्रतिनिधि):

(पंचशील काळे)
महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भातील विधानसभांमध्ये ग्रामीण भागात तळागाळातील सर्व सामन्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचावा या उद्देशाने स्थानिक विधानसभांमध्ये मा. आमदार व प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभेत किमान ५० पदवीधर युवक/युवतींच्या एका टीमच्या माध्यमातून कमीत कमी ५०,००० सर्व सामान्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचा मानस बाळगला आहे असा कथित मॅसेज सध्या वायरल होत आहे.
प्रशांत राठोड (८२०८३ ८२७०८)आणि व्यंकटेश राठोड (९५६१९ ५८७११) या नावाने सध्या मुखेड, नायगाव तसेच भोकर मतदारसंघा अंतर्गत शासकिय योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने काही कन्सल्टींगवाले नांदेड जिल्ह्यात व विदर्भात सुसक्षित बेरोजगार युवकांना संपर्क साधून त्यांच्या कडील शैक्षणिक अर्हता व पात्रतेच्या नोंदी घेऊन मोठ्या प्रमाण दिशाभूल करत आहेत. दि.२१-०७-२०२४ रोजी जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालय, सिडको, नांदेड येथे सकाळी ०९ ते ०१ पर्यंत मुलाखतीचे तत्सम युवकांना संदेश देण्यात पण आलेले आहे.
सदर ५० जणांची टीम हि स्थानिक आमदार यांच्या नेतृत्वात स्थानिक प्रशासकीय यंत्रणा, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गावंपातळीवरील कार्यकर्ते यांच्या माध्यमातून काम करतील. सदर ५० जणांच्या टीम मधील प्रत्येक युवक/युवतीस अनुभव, शिक्षण आणि काम बघता किमान १५ ते २० हजार रुपये पगार मिळेल. सोबतच सदर ५० युवक/युवतींच्या राहणे व प्रवासाची सोय स्थानिक आमदारांच्या मार्फत केली जाईल हा निरर्थक आशावाद व्यक्त करत आहेत.
हा पहिले प्रोजेक्ट असून पुढील ३ ते ४ महिन्यांमध्ये विधानसभांमध्ये चालेल तसेच त्यानंतर काम बघता उत्तम काम केलेल्या युवक/युवतींची निवड हि पुढील प्रोजेक्ट करिता करण्यात येईल. सदर कामाचे स्वरूप हे फील्ड वर्क असून ज्यांना सदर प्रकारच्या कामाचा अनुभव तसेच कामाकरिता स्थलांतरीत होण्याची इच्छा असेल अशांनी सदर कामाकरिता संपर्क करावा म्हणून सुसक्षीत बेरोजगारांची दिशाभूल करुण त्यांच्या बेरोजगार पणाचा फायदा घेत आहेत.
असा कोणताच जीआर नसून हे केवळ लुटमार आहे यावर स्थानिक पोलीस प्रशासन अधिकारी दक्ष राहून यथोचित कारवाई करावी अशी रास्त अपेक्षा जनसामान्य सुसक्षित बेरोजगार तरुणां कडून   तालुका, जिल्हा स्तरावरच नाही तर  महाराष्ट्रातून  ऐकायला येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close