हटके

लाजेखातर तिने गरोदर असल्याचे लपवले आणि झाले असे 

Spread the love

नवी मुंबई / नवप्रहार डेस्क 

                 एक अविवाहित तरुणी कुमारी अवस्थेत गरोदर राहिल्याने तिने ही बाब लपवून ठेवली. पण नियतीचक्राणूरूप गरोदर पणाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने तिने बाथरूम मध्ये बाळाला जन्म दिला. बाळ तर सुखरूप आहे परंतु तरुणीचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी वाशीमध्ये हा प्रकार घडला.

मूळची श्रीवर्धनची असलेली तरुणी मेमध्ये वाशीतील जुहूगाव येथे कुटुंबासह राहण्यास आली होती. जूनमध्ये शाळा सुरू झाल्याने तरुणीची भावंडे आईसोबत श्रीवर्धनला परत गेली होती. त्यानंतर वडिलांसोबतच ही तरुणी जुहूगाव येथे राहत होती.

गुरुवारी सकाळी घरामध्ये एकटीच असलेल्या मुलीशी तिच्या वडिलांनी मोबाईलवरून संपर्क साधला होता, मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याने शेजाऱ्यांना दरवाजा उघडून पाहण्यास सांगितले होते. यावेळी घरातील बाथरूममध्येच तरुणी बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले.

जुहूगावात राहण्यास आलेल्या मुलीवर तिच्या मूळगावी श्रीवर्धन येथेच कुणीतरी लैंगिक अत्याचार केला असण्याची शक्यता आहे, तसेच मुलगी गरोदर राहिल्याचे कुणालाही समजू नये, यासाठी आई- वडिलांपासून हा हा प्रकार लपवल्याची शक्यता आहे. वाशी पोलिसांनी बलात्कार, तसेच पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, मात्र हा गुन्हा श्रीवर्धन येथे घडल्याने हे प्रकरण वर्ग होईल, अशी शक्यता आहे.

जन्म दिलेले नवजात बाळ जिवंत होते. त्यामुळे दोघांनाही वाशीच्या महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले असून नवजात बाळावर सध्या पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close