सामाजिक
राज्यातील आणखी एक बँक डबघाईस ,हजारो कोटीच्या ठेवी अडकल्या
बीड / नवप्रहार डेस्क
कुटे ग्रुप वर पडलेल्या प्राप्तिकर विभागाच्या छाप्यानंतर अडचणीत आलेल्या या ग्रुप ची ज्ञानराधा पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या तापसानंतर या पतसंस्थेत पावणेचार लाख ठेवीदारांच्या ठेवी असून ऐकून 3 ,715 कोटी 58 लाख 72 हजार रुपये अडकले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने 35 गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे ठेवीदारांची धाकधूक वाढली आहे.
ज्ञानराधा पतसंस्थेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या पतसंस्थेत ठेविदारांचे तब्बल 3 हजार 715 कोटी 58 लाख 72 हजार रुपये आडकले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 35 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुरेश कुटे अध्यक्ष असलेली ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्था कुटेग्रुपवर नोव्हेंबर २०२३ मध्ये पडलेल्य प्राप्तीकर विभागाच्या छाप्यानंतर आर्थिक अडचणीत आली आहे. या पतसंस्थेत तब्बल पावनेचार लाख ठेविदारांच्या ठेवी अडकल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा पतसंस्थेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात ठेविचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यात मिळून या पतसंस्थेच्या एकूण 52 शाखा आहेत. यात पावणेचार लाख ठेवीदार आणि बचत खातेदार यांचे तब्बल 3 हजार 715 कोटी 58 लाख 72 हजार रुपये अडकलेले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सुरेश कुटेंच्या राज्यभरातील 200 कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेल्या 120 मालमत्तांची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. इतर राज्यातील मालमत्तांचाही शोध सुरु असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली आहे.
सुरेश कुटे अध्यक्ष असलेली ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्था कुटे ग्रुपवर नोव्हेंबर 2023 मध्ये पडलेल्य प्राप्तीकर विभागाच्या छाप्यानंतर आर्थिक अडचणीत आलेली आहे. ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यास पतसंस्था असमर्थ ठरल्याने पतसंस्थेत मोठा घोटाळा झाल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान, 9 महिने उलटूनही ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदारांनी पोलीस व न्यायालयात धाव घेत गुन्हा नोंदवायला सुरुवात केली आहे. ज्ञानराधाच्या बीड जिल्ह्यात 22 शाखा असून, आतापर्यंत एकूण 35 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 20 कोटी 22 लाखांच्या फसवणूक प्रकरणात हे गुन्हे दाखल झाले आहेत.