मुलाच्या वरातीत आलेला सासरा मुलीच्या आईला घेऊन पळाला

मुंबई / नवप्रहार डेस्क
काही घटना अश्या घडतात की तोंडातून घोर कलियुग आले आहे असे शब्द आपसूकच बाहेर पडतात. एकीकडे पोटच्या मुलीवर बापाकडून अत्याचार होत आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात निरागस बालिकेवर मातृत्व लादल्या जात आहे. तर दुसरीकडे लग्न करून सून घेण्यासाठी आलेला मुलाचा बाप मुलीच्या आईला घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे फक्त कालियुगच नव्हे तर घोर कलियुग आल्याचे बोलल्या जात आहे.
मुलांचा विवाह होण्यापूर्वीच वरपिता आणि वधूची आई फरार झाल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हे व्याही फरार होण्यामागे विचित्र कारण आहे. हे कारण समजल्यावर अनेक नेटिझन्सनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही नेटिझन्सनी या प्रकाराची खिल्ली उडवली, तर काहींनी त्यावर टीका केली आहे.
प्रेमात पडलेला व्यक्ती वाट्टेल ते करायला तयार होतो ही गोष्ट नुकतीच वास्तवात पाहायला मिळाली. आपापल्या मुलांचा विवाह करून व्याही व्हायचं ठरवलेल्या व्यक्ती मुलांच्या विवाहापूर्वी फरार झाले. सध्या या प्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. आयुष्यात अजून काय काय पाहायला मिळणार असा तिरकस सवाल विचारून, लोक या पोस्टवर कमेंट्स करत आहेत.
उत्तर प्रदेशातल्या कासगंज इथल्या दोन मित्रांनी आपली मैत्री नात्यात बदलण्याचा निर्णय घेतला. दहा मुलांचे वडील असलेल्या शकील यांच्या मुलाचा विवाह सहा मुलांचे वडील असलेल्या व्यक्तीच्या मुलीशी निश्चित झाला. विवाह निश्चित झाल्यावर शकील मुलीच्या आईशी संवाद साधू लागले. त्यानंतर हे दोघं प्रेमात पडले आणि मुलांच्या विवाहापूर्वी फरार झाले.
या घटनेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यावर नेटिझन्सची वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एक युझर लिहितो, की ‘बिचारे पती-पत्नी होणार होते; पण त्यांच्या आई-वडिलांनी त्यांनी भाऊ-बहीण बनवलं.’ दुसरा एक युझर लिहितो, की ‘काय लव्ह स्टोरी आहे. असं अजून एक-दोन वेळा घडलं तर मुलगा आणि मुलगी त्यांच्या आई-वडिलांना लग्नाच्या मांडवात येऊ देणार नाहीत.’ तिसऱ्या एका युझरने लिहिलं आहे, की ‘वय हा महत्त्वाचा मुद्दा नाही, हा नॅरेटिव्ह सेट झाला आहे. अशा घटना वारंवार ऐकायला मिळत आहेत.’
‘प्रेम कोणत्या पातळीवर पोहोचलं आहे, तेच कळत नाही. हे प्रेम नाही तर पाप आहे,’ असं एका युझरने म्हटलं आहे. ‘त्यांनी विवाहानंतर तरी फरार व्हायचं. त्यांना मुलांचा आनंद आणि आयुष्याशी काही देणं-घेणं नाही,’ असं एका युझरने कमेंटमध्ये लिहिलं आहे. ‘आई-वडील अशा मार्गावर चालत असतील तर त्यांच्या मुलांनी मोठं कांड केलं पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे. सोशल मीडियावरचा एक युझर लिहितो, की ‘देश प्रगती करतोय. त्यामुळे अशा घटनांकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही.’
दरम्यान, वधूपित्याने सांगितलं, की ‘शकीलने माझ्या पत्नीला फूस लावून पळून नेलं आहे.’ त्यांनी स्वतः पत्नीचा शोध घेतला; पण ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. पोलीस आता या दोघांचा शोध घेत आहेत.