हटके

बायको ती बायकोच असते, मग ती कोणाची का असेना

Spread the love

             पत्नी असताना देखील बाहेरख्याली व्यक्तीला बाहेर लफडे केल्या शिवाय गमत नाही. प्रेयसीला भेटण्यासाठी मग तो अनेक क्लुप्त्यांचा वापर करतो. पण बायको ती बायकोच असते. तिच्या नजरेतून पतीच्या वागणुकीत पडलेला बदल लपून राहत नाही. आणि तिला जर अशी शंका आली तर मग ती पतीची जासुसी करायला लागते. एका पत्नीला आपल्या नवऱ्यावर संशय होता. मग सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने पतीला प्रेयसी सोबत रंगेहाथ पकडले. आणि मग समुद्र किनारीच सुरू झाला हंगामा.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, तो दुसऱ्या ठिकाणी गर्लफ्रेंडसोबत होता. त्याचवेळी पत्नीने त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शोधून काढलं. तिने फुलपूफ्र प्लान बनवला आणि दुसऱ्या महिलेसोबत त्याला रंगेहाथ पकडलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

9 महिन्याची गर्भवती असणाऱ्या केली स्मिथने नवऱ्याला समुद्र किनारी दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं. त्यानंतर जे घडलं, ते कुठल्या चित्रपटातल्या सीनपेक्षा कमी नव्हतं. व्हायरल व्हिडिओमध्ये केली रागाच्या भरात फसवणूक करणाऱ्यावर नवऱ्यावर ओरडताना दिसतेय. नवरा आणि त्याची प्रेयसी बीचवर आराम करत होते. व्हिडिओमध्ये गर्भवती महिला जोरात चालत त्यांच्या दिशेने जाताना दिसतेय.

काय बोलायच हे तिला सुचत नाही

रागात ती नवऱ्याला विचारते, ही कोण आहे?. पत्नीला पाहून नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे रंग उडतात. तो शांतच बसून राहतो. त्यावेळी पत्नी सोबत असलेल्या महिलेच व्हिडिओ रेकॉर्डींग करते. मी याची पत्नी आहे, तू कोण आहेस? अचानक पत्नी येऊन धडकल्याने त्या व्यक्तीची प्रेयसी सुद्धा भांबावून जाते. काय बोलायच हे तिला सुचत नाही. ती काहीच बोलत नाही.

तू इथे मजा करतोयस

त्या व्यक्तीची पत्नी चिडून बोलते, ‘मी दोन आठवड्यात बाळाला जन्म देणार आहे आणि तू इथे मजा करतोयस’ त्यावर नवरा ओरडून बोलतो, आपला घटस्फोट झालाय. पण पत्नीने स्पष्ट केलं की, ‘घटस्फोट झालेला नाही’

लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला  केलीने स्वत: हा व्हिडिओ टिकटॉकवर शेयर केलाय. हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. बहुतेकांनी त्या व्यक्तीला खडेबोल सुनावताना न्यायाची मागणी केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close