महिलांसाठी गोल बाजारात मदत कक्ष…
राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित दादा पवार गट )आर्वी विधानसभा कार्यालयात लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी गर्दी..
आर्वी ( निखिल वानखडे )
आर्वी येथील गोल बाजारातील राष्ट्रवादी काँग्रेस( अजित पवार गट) यांच्या विधानसभा कार्यालयात लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी आज रविवारी तारीख 14 ला महिलांची अकरा वाजल्यापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मोठी गर्दी होती
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत त्यांना पंधराशे रुपये मदत दिल्या जाणार आहे.त्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्यात आली .मात्र अनेक सेतू केंद्रावर व इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने गरीब गरजू महिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. अनेक तास तिथे बसून राहावे लागत होते त्यामुळे आर्वी विधानसभा राष्ट्रवादी अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी त्यांच्या गोलबाजार येथील कार्यालयात गरीब गरजू महिलांना फॉर्म भरून देऊन मदत करण्याचे काम करून सुविधा निर्माण करून दिल्या .
त्यामुळे या महिलांनी आज रविवारी तारीख 14 ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात गर्दी केली होती .महिलांच्या फॉर्म भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे कागदपत्राची जुडवा जुडव करतानाही मोठ्या प्रमाणात त्यांना अडचण येत आहे त्यामुळे त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने आर्वी येथे येथील राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र कार्यालयात मदत कक्ष उघडण्यात आला असून महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याची विनंती आज सायंकाळी साडेसहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी केली आहे
फोटो ओळी… दिलीप पोटफोडे यांच्या कार्यालयातील महिलांची गर्दी