अन .. त्यांच्याकडे मित्राला वाहतांना। पाहिल्याशिवाय पर्याय नव्हता
रत्नागिरी / नवप्रहार डेस्क
पावसाळ्यात पाणी वाहताना पाहून अनेकांना पोहण्याचा मोह आवरत नाही. यापैकी काही लोक आवड म्हणून तर काही लोक आपला आगाऊ पणा दाखवण्यासाठी दुथडी भरून वाहत असलेल्या नदी, नाले, धरणात पोहायला जातात. आणि नकळत मृत्यूच्या दाढेत जातात.
काही दिवसांपूर्वीच पुण्यात लोणावळ्यातील भूशी धरण येथे वर्षाविहाराचा आनंद घेताना एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेले. तसेच दुसऱ्या एका घटनेत ताम्हिणी घाटामध्ये धबधब्यामध्ये उडी मारल्यानंतर जोरदार पाण्याचा प्रवाहाबरोबर वाहून गेला. दोन्ही घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते दरम्यान आता रत्नागिरीमधून नवा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान धरणात पोहायला गेलेला ३२ वर्षीय तरुण वाहून गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसामुळे चिपळूण, खेड, राजापूरसह संगमेश्वर शहर परिसरात पूर परीस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यत १७७ लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव जयेश आंब्रे असून आहे. घटनेनंतर बचाव पथकाने शोध मोहिम सुरु केली आहे. मित्रांच्या डोळ्यादेखत हा तरुण जोरदार पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा येत आहे.
व्हिडीओमध्ये दिसते की, धरण परिसरामध्ये काही तरुण पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी एकाने व्हिडीओ शूट केला आहे. इतर तीन तरुण धरणाच्या पाण्यात उतरताना दिसत आहे. दरम्यान एक तरुण प्रथम पाण्यामध्ये उतरतो. ज्या क्षणी हा तरुण पाण्यात पोहण्यासाठी उतरतो तसा तो पाण्याच्या प्रवाहासह पुढे जातो. एका ठिकाणी जाऊन तो क्षणभर थांबतो. पुढच्या क्षणी तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे वाहून जातो. पाण्याच्या पातळीमध्ये अचानक वाढ झाल्याने तरुणाला पाण्याचा अंदाज नाही आणि तो वाहून गेला.
एक्सवर @Satish_Daud नावाच्या खात्यावरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये दिसते की,’रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. खेडमध्ये शेल्डी धरणाच्या प्रवाहातून ३२ वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे.’
मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका
कोकण रेल्वेच्या मार्गावरील दिवाणखवटी आणि व्हीनेरे दरम्यान दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेमार्गावर (Konkan Railway) अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. एक्स्प्रेस ट्रेन जागच्या जागी उभ्या असून कोचीवेल्ली एक्स्प्रेस ट्रेन (Konakn Express Trains) गेल्या १३ तासांपासून चिपळूण स्थानकात उभी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी नातुवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडे ट्रॅकवर आली असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबवण्यात आली. श्री गंगानगर एक्स्प्रेस कामथे स्थानकात, तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरी तर सावंतवाडी दिवा गाडी दिवाणखवटी स्थानकात थांबवण्यात आली आहे. १२०५२ रत्नागिरी मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस आणि २२१ मडगाव सीएसएमटी तेजस एक्सप्रेस रत्नागिरी येथे आली आहे . १०१०६ सावंतवाडी दिवा एक्सप्रेस दिवाखती येथे आली आहे.