क्राइम

जेथे महिला पोलिसच सुरक्षित नाही तेथे इतर महिलांची काय बिसात 

Spread the love

नाशिक / नवप्रहार डेस्क 

             ज्या राज्यात महिला पोलीस कर्मचारीच सुरक्षित नाही त्या ठिकाणी इतर महिलांची काय बिसात असे म्हणणे वावगे ठरू नये. महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार होतो तो ही पोलीस प्रशिक्षण केंद्रात तर मग सामान्य महिला ज्या घरात असतात त्या कश्या सुरक्षित राहतील असा प्रश्न निर्माण होतो. पोलीस प्रशिक्षण केंद्रात स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीच्या तरुणाने हा प्रकार केल्याचे समजते. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला पोलीस कर्मचारी आणि संशयित आरोपीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी संशयित आरोपी सुमित याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलीस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीत कर्मचारी असलेल्या तरुणासोबत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे प्रेमसंबंध होते. आरोपीकडून महिलेला शारीरिक संबंधासाठी विचारणा करण्यात आली. तिने नकार दिल्यानं आरोपीने पोलीस महिलेला बेदम मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. महाराष्ट्र पोलीस अकादमीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं. तिथंच असा प्रकार घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या रहिवासी वसाहतीत घडला. महाराष्ट्र पोलीस अकादमीत रात्रभर सदर महिला पोलीस कर्मचाऱ्याला संशियत आरोपीने मारहाण केली. त्यानंतर संशयित आरोपीने बलात्कार केल्याची तक्रार महिलेने पोलिसात दाखल केली. तक्रार देणारी महिला पोलीस कर्मचारी खाजगी रुग्णालयात असून तिच्यावर उपचार केले जात आहेत. बलात्कार आणि मारहाणीनंतर संशयित आरोपीने पीडित महिलेचे व्हिडिओ देखील काढले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close