कोतवाल संघटनेच्या नांदेड जिल्हा सचिवपदी राजेश राठोड यांची नियुक्ती
बिलोली (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या नांदेड जिल्हा सचिवपदी उमरी तालुक्यातील कोतवाल राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनाचे राज्य अध्यक्ष शिवप्रसाद देवणे व नांदेड जिल्हाध्यक्ष सुधाकर डोईवाड यांनी विशेष बैठकीनंतर कोतवाल राजेश राठोड यांची नांदेड जिल्हा सचिवपदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र देवून त्यांचे गौरव केले आहे. राजेश राठोड हे मागील काळात महाराष्ट्र राज्य जिल्हा कोतवाल कार्यालयात अतिशय महत्वपुर्ण योगदान दिले आहे संघनेच्या कामासाठी त्यांची तळमळ, धडपड, जिद्द, या
विविधांगी गुणांचे मुल्यमापन करून त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून
राजेश राठोड यांची सचीव पदाची नियुक्ती करून पुढील जबाबरी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांनी हे पद चोखपणे सांभाळून संघटनेचे इमान इतबारे विश्वासाने काम पारपाडावे म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजेश राठोड हे उमरी तालुक्यात सञ्जा बोथी सज्जा मनूर येथे उत्कृष्ठ कार्य करतात व संभाजीनगर (औरगांबाद) विभागीय महसुल क्रिडा व सांस्कृतिक आणि खो-खो खेळाडू म्हणून त्यांची उत्तम ख्याती आहे. महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना नांदेड जिल्हा सचिवपदी राजेश राठोड यांची निवड झाल्या बद्दल उमरी
तहसीलदार प्रशांत थोरात, नायब तहसीलदार गिरीश सर्कलवाड, नायब तहसिलदार संजय सोलंकर, काशीनाथ देशटवाड तलाठी राऊत, तलाठी बी. जी. कदम, तलाठी मुर्तुजा शेख, तलाठी खानसोळे, कोतवाल दिलीप यम्मेवार, उत्तम हानवते, मलू कंबळे, मोईस शेख शिरूर, साईनाथ तोटेवाड बितनाळकर आदी तहसील महसुल कर्मचारी, कोतवाल संघटना मित्रमंडळी यांच्याकडू नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे.