आणि चोरट्याचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला….

.
आर्वी (निखिल वानखडे)
चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसलेल्या व्यक्तीच्या विरोधात आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या संदर्भात आर्वी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपासात घेतला असल्याची माहिती आज दुपारी एक वाजता दिली आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे विनोद चंद्रभानजी गडलिंग वय 45 वर्ष राहणार वाढना वार्ड क्रमांक चार हे दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास कुटुंबासह झोपले होते.
त्यांना कपाट वाजविण्याचा आवाज आल्याने ते झोपेतून जागे झाले त्यांना वाढवणा येथील राहुल विठ्ठलराव चरडे हा घरातील लाईट काढून ठेवून कपाट उघडून चोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे असे दिसून आले
त्यांनी या संदर्भात तू माझ्या घरी कशाला आला आहे असे विचारले असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिले राहुल चरडे हा माझ्या घरी चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याची खात्री झाली असे फिर्यादीने तोंडी तक्रार दिल्याने पोलिसांनी तारीख 12 दुपारी अडीच वाजता गुन्ह्याची नोंद करून तपासात घेतला असल्याची माहिती दिली आहे