श्री मुलिका देवी विद्यालय व कवाद इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दिंडी ने वेधले ग्रामस्थांचे लक्ष .
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – सध्या सुरू असलेल्या पायी वारी ने पंढरपूर च्या श्री विठ्ठल , रखमाई च्या दर्शनाच्या ओढीने सुरू असलेल्या दिंडी मुळे अक्षरशः भाविक भक्त तल्लीन झाले असून प्रत्येकाला पंढरपूर च्या वारीला जाणे शक्य नसल्याने निघोज मधील नगर जिल्हा मराठा विदया प्रसारक संस्थेच्या श्री मुलिका देवी माध्यमिक विद्यालय व बाबासाहेब कवाद सेवाभावी संस्थेतील विद्यार्थ्यांनी काढलेल्या बाल दिंडीने निघोज परिसर अक्षरशः भक्ती रसात न्हाऊन निघाला .
शनिवारी सकाळी श्री मुलिका देवी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल , रखमाई व वारकऱ्यांचा वेश परिधान करून पालखी घेत, खांद्यावर भगवा झेंडा व विठ्ठल , रखमाई , संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या नामाचा टाळ वाजवून गजर करत विद्यालया पासून श्री मळगंगा माता मंदीरा पर्यंत , येथे बाल श्री विठ्ठलाची वेशभूषा केलेला इयत्ता ७ वी चा विद्यार्थी सर्वज्ञ सुरेश खोसे पाटील व रुखमिणी ची वेशभूषा परिधान केलेली इयत्ता ९ वी ची विद्यार्थीनी स्नेहल निलेश लाहीगुडे यांचा सरपंच सौ . चित्रा वराळ पाटील व सचिन वराळ पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . यावेळी विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होते . तदनंतर संपूर्ण गावाला विद्यार्थ्यांनी दिंडी प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा विद्यालयात ही दिंडी गेली .
जीवनात एकदा तरी पंढरीच्या वारीला जावे , पण प्रत्येक भक्ताला जाणे , शक्य होत नाही . म्हणून निघोज मधील श्री मुलिका देवी विद्यालयाची पायी दिंडी वारी नंतर पठारवाडी च्या घोडोबा फाट्यावरील बाबासाहेब कवाद सेवाभावी संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या वारकऱ्यांच्या संपूर्ण वेशभूषेने व विठ्ठल नामाच्या गजराने निघोज परिसर गजबजून गेला .
यावेळी श्री मुलिका देवी विदयालय व बाबासाहेब कवाद सेवाभावी संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .