अंगात भूत असल्याची बतावणी करून महिले सोबत अघोरी कृत्य
मोर्शी /प्रतिनिधी
तालुक्यातील विवाहित महिलेच्या अंगात भूत असल्याचे बतावणी करून अघोरी कृत्य करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून हा प्रकार करणारा फिर्यादी महिलेचा पती,मौलाना व पतीचे दोन मित्र यांच्या विरोधात पोलिसांनी जादूटोना कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सिम्भोरा येथे रहात असलेल्या महिलेने दिलेल्या फिर्यादी नुसार फिर्यादी च्या पतीने पत्नी ला पाळा येथे मौलाना यांचेकडे नेले तेव्हा त्यांच्या पतीचा मित्र हा तेथे हजर होता. त्यामुळे ती महिला गाडीतच बसुन राहली तेव्हा गाडीजवळ एक मौलाना आला व त्याने हाताची नाडी तपासुन पतीच्या मित्राला पाणी घेवुन ये असे म्हटले व पाणी आणुन दिल्यावर मौलाना याने त्याचे मंत्र बोलुन ते पाणी महिलेला पिण्यास दिले परंतु तिने नकार दिल्याने त्यांनी ते पाणी जबरदस्तीने तिच्या तोंडामध्ये टाकले व चेह-यावर सुध्दा शिंपडले.
यानंतर तिचे पती व त्याच्या मित्राने जबरदस्तीने मौलाना चे खोपडीत घेवुन गेले व मौलाना याने त्याचे जवळील सुगंधी अत्तर महिलेच्या डोळयामध्ये टाकले त्यामुळे डोळयाची अंगार झाल्याने त्यांच्या तावडीतुन सुटण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी डोक्याचे केस पकडुन हिच्या अंगात भुत आहे असे म्हणुण त्याचे जवळील कपाशी च्या वाता, सरसुचे तेल, पाणी, सोप, अश्या वस्तु महिलेच्या पतीच्या सोबत दिले व सागितले की यानतर जर हिने असे कृत केले तर तुम्ही हिच्या डोक्याचे केस पकडुन मी दिलेल्या वस्तु चा प्रयोग करायचा व ते सर्व सिभोरा येथे आपल्या गावी परत आले. त्यानंतर महिलेची नणद सुध्दा घरी आली व पती तसेच नणदेने मौलाना याने सांगीतल्या प्रमाणे महिलेच्या डोळ्यासमोर वाता लावुन पाणी पाजले व सोप खाण्यास दिली. याबाबत त्या महिलेने आई वडीलांना फोन लावण्याचा प्रयत्न केला असता फोन हिसकावुन घेतला. दरम्यान फिर्यादी महिला बेशुद्ध पडल्याने तिला मोर्शी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. वैधकीय उपचार घेऊन गावाला परत गेल्यानंतर सुध्दा तिच्या पतीने तिचे डोक्याचे केस पकडून अंगनामध्ये आपटले व मित्राला फोन करून घरी बोलावीले व हीच्या अंगात भुत आले हिला तुम्ही घरात घेवुन जा असे म्हटले. त्यावेळी घराशेजारील लोक आले व त्यांनी तिला घरात घेवुन गेले. दि. 11 जुलै ला सकाळी 11 चे दरम्यान मी माझे घरी सिंभोरा येथे तिचे पती विकास आंडे हे घरात दिवा लावत असतांना त्यांना दिवा लावण्यास मनाई केली तर त्यांनी नेहमी प्रमाणे तिच्यावर प्रयोग करणे सुरू केले.
तिच्या पतीने घराचे मुख्य दरवाज्याला कुलूप लावले परंतु गावातील पोलीस पाटील व ईतर नागरिकांनी त्याला पतीने दार उघडायला बाध्य केले
या सर्व प्रकरणात आरोपी महिलेचे पती विकास अरूण आंडे व नणद ,पाळा येथील मौलाना तसेच पतीचे मित्र अंकुश राजगुरे व अक्षय राजगुरे यांनी तुझे अंगात भुत आहे असे म्हणुन माझे वर वाता, सरसुचे तेल, पाणी, सोप, अश्या वस्तुचा प्रयोग करून मंत्र मारून अंधश्रधेमध्ये फसवुन शारीरीक व मानसिक छळ करून त्रास दिला आहे अशा प्रकारची तक्रार
मोर्शी पोलीस स्टेशनला देण्यात आली.
या तकारीवरून कलम 85,115 (2), 352,3(5), बी एन एस, सहकलम 3(1) (2) (३), महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समुळ अच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.