सामाजिक

रांधुबाई देवस्थानचे उपाध्यक्ष अनिल आवारी यांची निलेश लंके प्रतिष्ठाणच्या तालुका युवक उपाध्यक्ष पदी निवड

Spread the love

वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या नियुक्तीचे पारनेर तालुक्यात स्वागत .

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – रांधे येथील जागृत देवस्थान असलेल्या रांधुबाई देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष अनिल लक्षमण आवारी यांची निलेश लंके प्रतिष्ठाणच्या पारनेर तालुका युवक उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली . त्यांना खासदार डॉ . निलेश लंके यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले .
पारनेर अळकुटी रोड वरील हॉटेल साईदीप व साईदीप उद्योग समूहाचे सर्वेसर्वा असलेले अनिल लक्ष्मण आवारी यांचा काल बुधवार दि . १० रोजी वाढदिवस असल्याने त्यांनी व त्यांच्या मित्र परिवाराने जिल्हा परिषदेच्या कारवाडी शाळेतील विद्यार्थां ना खावू वाटप केले , यावेळी या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले , या शाळेच्या शिक्षकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन करून छोटासा सत्कार केला व अळकुटी पंचायत समिती गणात विविध उपक्रम राबविण्यात आले .
रांधुबाई देवस्थानचे उपाध्यक्ष असलेल्या अनिल आवारी यांची नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ . निलेश लंके यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने राज्य कार्यक्षेत्र असलेल्या निलेश लंके प्रतिष्ठाण च्या पारनेर तालुका युवक उपाध्यक्ष पदाचा भार देवून युवकांचे संघटन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली व नियुक्तीचे पत्र खा . डॉ . लंके यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या सत्कार समारंभ दिले . तद्नंतर खा . डॉ . लंके यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या सदस्या राणी ताई लंके यांनीही अभिष्टचिंतन करून सत्कार केला .
दिवंगत सरपंच लक्ष्मण आवारी यांचे सुपुत्र असलेले अनिल आवारी यांचा पारनेर तालुक्यातील असणाऱ्या युवकांशी संपर्क , खा . डॉ . निलेश लंके यांच्याशी असणारी एकनिष्ठता व जवळीकता व पारनेर पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर यांच्याशी असलेले नातेसंबंध त्यांना आगामी काळात राजकीय क्षेत्रात नक्कीच कामी येतील , अश्या त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने ” दैनिक पारनेर समर्थ ” व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ परिवाराच्या वतीने शुभेच्छा .

अल्पावधीतच एक यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक कमावलेले एक तरुण व्यक्तीमहत्व व व्यवसायातून कसं पुढे जाता येतं , हे तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ज्यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात समोर येते , असे यशस्वी उद्योजक रांधुबाई देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणून यशस्वी पणे काम पाहत असताना रांधे गावच नव्हे , तर पंचक्रोशी मधील जनसामान्यांच्या सुख , दुःखात हक्काने उभा राहणारा तरुण , रांधे गावचे दिवंगत सरपंच लक्ष्मणराव आवारी यांचे अकाली छत्र हरप त्यानंतरही वडीलांचाच समाजकारणातील वारसा व वसा, त्यांच्याच आशिर्वादाने व पाऊलावर पाऊल ठेवून, काकणभर का होईना , जास्त घेवून तितक्याच ताकदीने पेलणारे तरुण व्यक्ती महत्त्व आगामी काळात पारनेर तालुक्यात चमकल्याशिवाय राहणार नाही ,असा विश्वास व्यक्त करून पारनेर पंचायत समितीच्या अळकुटी गणाचे भावी सदस्य अनिलराव आवारी यांस शुभेच्छा दिल्या आहेत ,
संतोष कापसे , माजी अध्यक्ष – महात्मा गांधी तंटामुक्त समिती पाबळ . ]

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close