क्राइम

महाविद्यालयीन तरुणीच्या तोंडावर स्प्रे मारून अपहरण व सामूहिक बलात्कार 

Spread the love

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 45 हजार हिसकवले 

सिडको / नवप्रहार डेस्क 

            महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीला तिच्या तोंडावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध कायुन तिचे अपहरण करण्यात आले. आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिला अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून 45 हजार हिसकावून घेतले. आणि तिला पट्ट्याने मारहाण केली. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी विजय परदेशी (रा. विजय नगर, सिडको) व पीडिता यांचे काही दिवसांपूर्वी लग्नाची बोलणी चालू होती; मात्र, संशयित आरोपी याने पीडित मुलीशी लग्न करण्यास नकार दिला होता. पीडिता कॉलेजमध्ये गेली असता त्या ठिकाणी वर्गात सात विद्यार्थिनी बसलेल्या होत्या. त्यांच्यातील एका विद्यार्थिनीने तिच्या तोंडावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध केले.

त्यानंतर संशयित परदेशी याने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने तिला कारमध्ये बसवून अज्ञात ठिकाणी नेले. त्या ठिकाणी त्याच्यासोबत असलेल्या दोन्ही मित्रांनी तिच्यावर अत्याचार केला. तसेच पट्ट्याने जबर मारहाण करून नंतर तिला सोडून दिले.

भीतीमुळे कुठंही वाच्यता नाही

पीडित मुलीने बदनामीच्या भीतीने या घटनेचे कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, काही दिवसांनी संशयित आरोपीने पीडित मुलीच्या वेगवेगळ्या नंबरवरून मोबाईलवर अश्लील फोटो पाठवून पैशांची मागणी केली. तिने घाबरून घरातून रोख 45 हजार रुपये व तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने संशयित आरोपीला दिले.

फोटो व्हायरल करण्याची धमकी

संशयित आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने परत पीडितेला सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत भेटायला बोलावले. शेवटी त्याचा त्रास सहन न झाल्याने अंबड पोलीस ठाण्यात जाऊन संशयिताविरोधात तक्रार दाखल केली.

सामूहिक अत्याचार करून पट्ट्याने मारहाण

संशयित आरोपी परदेशी याने त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने तिला चारचाकी वाहनातून एका अज्ञात ठिकाणी रूममध्ये घेऊन गेले. यावेळी संशयीत परदेशी व त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांनी तिच्यावर अत्याचार केला. तसेच पट्ट्याने मारझोड करून चार चाकी वाहनाने पुन्हा महाविद्यालय येथे सोडून दिले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close