क्राइम

महिलेला डॉक्टर कडून विवस्त्र करून मारहाण 

Spread the love

बुलढाणा  / नवप्रहार डेस्क 

                      आपण डॉक्टर लोकांना उच्चशिक्षित समजतो. पण सध्याचे तरुण डॉक्टर व्यसनाधीन असल्याने त्यांच्या कृत्यामुळे ते अडाण्या पेक्षाही बेकार वागत असल्याचे अनेक प्रकरणातून दिसून येत आहे. एका डॉक्टर ला महिलेने रात्री 3 वा. चहा आणि सिगारेट देण्यास मनाई केल्याने तिला निर्वस्त्र करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. 

बुलढाण्यातली जळगाव जमोद तालुक्यात राहणारी एक महिला किराणा मालाचे एक छोटंसं दुकान चालवते. महिलेचे दुकान घराला लागूनच आहे. मध्यरात्री तीन वाजता एका डॉक्टरने महिलेच्या दुकानाचा दरवाजा ठोठावला. महिलेनं दार उघडलं. त्यावेळी डॉक्टरने महिलेकडे एक सिगारेट आणि चहाची मागणी केली. मात्र, महिलेनं डॉक्टरला नकार दिला. आता फार उशीर झाला आहे, तुम्ही उद्या या, असे महिलेने सांगितले. पण महिलेने दिलेल्या नकारानं डॉक्टरला राग अनावर झाला. त्यानं महिलेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेचे कपडे फाडले आणि तिला निर्वस्त्र देखील केले.

गोविंद वानखेडे असे महिलेला निर्वस्त्र करुन मारहाण करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. सध्या महिलेला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी डॉ. गोविंद वानखेडे याच्यावर कलम 376/2024 , 74,75,76,,296,324(1),333,352,351(2),351(3),3(5) भारतीय न्याय संहितेनुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे. पण, आरोपी डॉक्टर फरार झाला आहे. पोलिसांकडून फरार डॉक्टरचा शोध सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close