सामाजिक

घाटंजी फोटोग्राफर बहूउदेशिय संस्थेचा अभिनव उपक्रम

Spread the love

 

वृक्षारोपण सह घाटंजी शहराचे छायाचित्राचे मान्यवरांन हस्ते अनावरण

घाटंजी तालुका प्रतिनिधी- सचिन कर्णेवार
घाटंजी – दी ४/७/२४ रोज गुरुवार ला आय लव घाटंजी जयस्तंभ चौक येथे घाटंजी फोटोग्राफर असोसिएशन बहूउदेशिय संस्था र. न.०३६/ २०२४ च्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबविल्या गेले. यामधे घाटंजी शहराचे छायाचित्र ड्रोन कॅमेरा व्दारा टीपून घाटंजी नगर. प. ला भेट स्वरुपात देण्यात येऊन त्या छायाचित्रण चे अनावरण कार्यक्रम व वृक्षारोपण, रुक्ष वितरण कार्यक्रम जयस्तंभ चौकात घेण्यात आला. सदर कार्यक्रमास घाटंजी न.प. मुख्याधिकारी राजू मोट्टेमवार उद्घाटक तथा अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंडीत साहेब, राष्ट्रनिर्माण विचारधारा चे ॲड. गजेंद्र ढवळे,अनंत नखाते, सामाजिक कार्यकर्ते मधूकर निस्ताने, फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्ष किशोर ठाकरे हे होते. कार्यक्रम सुरवात शहीद जयस्तंभास व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. तदनंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्प गुच्छ व वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थातास मंचावरून मार्गदर्शन करतांना मुख्याधिकारी मोट्टेमवार यांनी घाटंजी विकासासाठी व स्वच्छतेसाठी आम्ही कट्टीबध असून अधिकारी म्हणून कार्य करतांना जनतेचे ही सहकार्य अपेक्षीत आहे असे मत व्यग्त केले. तसेच घाटंजीत स्वच्छतेस महत्त्व देत काही दीवसातचं जनतेच्या,व जनावरांच्या आरोग्यास हानिकारक असलेली निर्बंध पण्णी वापरावर कठोर कार्यवाही करुन पानटपरी,भाजिपाला,कीराणा दूकानात सर्रास वापरात येत असलेल्या घातक पण्णी चा वापरावर बंदी आणू. स्वच्छतेच महत्त्व जनतेस पटवून आरोग्यास प्राधान्य देऊ हे आश्वासन दीले.तसेच उपस्थित मान्यवरांनी ही आपले मनोगत व्यक्त करत घाटंजी स्वच्छतेवर व विकास कामांवर भर दीला.तदनंतर मान्यवर हस्ते घाटंजी शहराचे छायाचित्र चे अनावरण करण्यात येऊन घाटंजी पोलिस स्टेशन परिसरात उपस्थितांना हस्ते पिंपळ, आवळा,बेल,निंब, यांसारख्या प्रजातिचे वृक्ष लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रमास घाटंजीतील सामाजिक कार्यकर्ते,न. प. कर्मचारी, फोटोग्राफर उपाध्यक्ष अजिंक्य रुईकर, मनिष राठोड,कलोडे,राजु इंगोले, कपील मुनेश्वर,अमोल वारंजे,यश ठाकरे, क्षृतिक धांदे,नासिर शेख, अमित डंभारे,दादाराव राठोड तथा इतर ही फोटोग्राफर असोसिएशन सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम संचालन व प्रस्तावना संस्था सचिव सचिन कर्णेवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार अजिंक्य रुईकर यांनी मानले.
०००००००००००००००००

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close