हटके

इ रिक्षा चालक आणि तृतीयपंथी मध्ये रस्त्यावरच फ्रिस्टाईल 

Spread the love

 बदायु / नवप्रहार डेस्क

                तृतीयपंथीयांच्या अरेरावीचे अनेक किस्से पाहायला आणि वाचायला मिळतात. रेल्वेत किंवा सार्वजनिक ठिकाणी जबरदस्तीने पैशे मागण्यात त्यांना स्वारस्थ असल्याचे पाहायला मिळते. कोणी त्यांना पैशे देण्यास नकार दिल्यास त्यांना वाद घालतांना बघितले जाते. इ रिक्षा चालक आणि एका तृतीयपंथियात भर रस्त्यात वाद झाल्याचा आणि मारामारी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. भाड्याचे 10  रु न दिल्याने हा वाद झाल्याचे समजते.

ही घटना चार ते पाच दिवसांपूर्वीची असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तृतीयपंथी व्यक्तीने ई-रिक्षाचालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्या व्यक्तीने त्याला ई-रिक्षातून ओढत खाली उतरवले आणि शिवीगाळ करीत थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांनी एकमेकांचे टी-शर्ट पकडले आणि नंतर बुक्क्यांनी मारहाण करू लागले. यावेळी ई-रिक्षाचालकाने स्वतःच्या बचावाचा प्रयत्न करीत आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. धक्कादायक बाब म्हणजे मारामारी सुरू असतानाच तृतीयपंथी व्यक्तीने भररस्त्यात स्वच:ची पॅन्ट काढली आणि चालकाला धमकावण्यास सुरुवात केली.

इतकेच नाही, तर अशा विचित्र अवस्थेततही तिने चालकाला मारहाण करणे सुरूच ठेवले. यावेळी दोघांची मारामारी पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांची गर्दी जमा झाली होती. काही वेळाने यातील काही लोकांनी पुढे येत दोघांची समजूत घातली. त्यानंतर चालक आणि ती तृतीयपंथी व्यक्ती तिथून निघून गेली. दोघांकडूनही पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पण, त्या दोघांच्यातील मारहाणीचा व्हिडीओ कोणीतरी शूट केला आणि तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडिया युजर्सकडूनही ती महिला तृतीयपंथी असल्याचा दावा केला जात आहे; पण तिच्या या विचित्र कृतीवर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर अनेकांना तिचे असे वागणे पाहून धक्काच बसला आहे. या घटनेचे नेमके ठिकाण अद्याप कळलेले नाही; पण सार्वजनिक ठिकाणी हे लज्जास्पद कृत्य करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता लोक उपस्थित करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close