दुधाला हमीभाव मिळावा यासाठी लोक जागर अभियानाच्या वतीने जाफराबाद येथे करण्यात आले अनोखे आंदोलन…
जाफराबाद / प्रतिनिधी
जाफराबाद तहसील कार्यालयासमोर दूधाचा सडा व शेनाची ट्रीप गंजी टाकून केले आंदोलन व केंद्र सरकारच्या भुकटी जिआरचा ची केली होळी
जालना जिल्ह्यातील जाफराबाद शहरात छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात लोकजागर अभियानाचे नेते केशव पाटील जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी व दुध उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दुधाला हमी 45 रूपये भाव मिळावा, तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे सर सगट कर्ज मुक्ती,निराधारांच्या पगारी मानधन, पशु धनाला लागणारे औषध उपचार तसेच मोफत उपचार मिळावे, मधू न विहिरी,या सारख्या विवीध मागण्यांवर हे आंदोलन करण्यात आले आहे, या प्रसंगी जाफराबाद तालुक्यातील दुध उत्पादक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित झाले होते.
या वेळी बोलताना लोकजागर अभियानाचे नेते केशव पाटील जंजाळ म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांच्या दुधाला हमी 45 रुपये भाव द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांना व त्यांचे संगोपन करायला जो खर्च लागतो तो निघेल नुसता आता जो भाव दुधाला चालू आहे हा भाग शेतकऱ्याला परवणारा नसून सरकारने जे आता नवीन धोरणे लागू केली आहे याला सुद्धा तात्काळ रद्द करत. शेतकऱ्याच्या दुधा ला हमीभाव द्यावा सर्व राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासारख्या मागण्या त्वरित पूर्ण करावा नसता येत्या काही दिवसात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर राज्यात कुठेही दुधाचे टँकर फिरू देणार नाही. असा इशारा सुद्धा यावेळी लोक जागर अभियान संघटनेचे अध्यक्ष, केशव पाटील जंजाळ यांनी दिला आहे. मा तहसीलदार जाफराबाद यांना निवेदन देण्यात आले जे राज्याचे मुखयमंत्री साहेबाना अधिवेशनात पाठविले जाईल असा शब्द दिला यावेळी गजानन कड,प्रकाश शेळके, हर्षल फदाट,गोपाल ब-हाटे, सुनील फदाट,सचिन तेलांग्रे, ज्ञानेश्वर गाढे, किशोर कुदार, दिनकर जामुंदे, दिनकर जाधव,भरत गावंदे,सुनिल फदाट, योगेश चव्हाण, कृष्णा देव्हढे, दिलीप देव्हडे, राजु खोसरे, संतोष लोखंडे,राजू लोखंडे,कैलास जंजाळ ,संदेश फदाट,डॉ.योगेश बुंदे, किरत काकडे, राज जोशी,सचिन फदाट, पंजाबराव जाधव,दत्ता बकाल, विजय गावडे, उमेश आटोळे, यांची उपस्थिती होती.