वृक्षारोपण मेळावा आणि दिंडी यात्रा संपन्न
भंडारा / प्रतिनिधी
मौजा-मालुटोला ता. साकोली जि. भंडारा दि. ०२/०७/२०२४ रोज मंगळवारला विदर्भ शाहिर कलाकार परिषद कन्हान शाखा भंडारा व स्व. सुलोचना पारधीकर बहुउद्देशीय संस्था मासलमेटा तथा ग्रामपंचायत मालुटोला यांच्या संयुक्त विद्यमाने कलाकार परिषदेच्या माध्यमातून देशातपुढिल काही वर्षांत उद्भवणारे संकट नैसर्गिक व भौगोलिक या परिस्थितीवर मात करून “वृक्षारोपण, मेळावा व दिंडी यात्रा” चा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रीय अध्यक्ष मा. मनिषजी भिवगडे वि. शा. क. प. कन्हान यांच्या उपस्थितीत पार पडला तर केंद्रीय कार्याध्यक्ष मा. अलंकारजी टेंभुर्णे वि. श. क. प. कन्हान यांच्या अध्यक्षतेखाली मा. सह उद्घाटक मा. शंकरजी चहांदे माजी मा. जि. अध्यक्ष नागपूर मा. खांडेकर साहेब राऊंड आफिसर साकोली यांच्या प्रमुख उपस्थितीत, मा. अंबुले साहेब बिट वनरक्षक, मा. राजेशजी मरस्कोल्हे सरपंच ग्रा. पं. मालुटोला, मा. दिनेशजी कटरे उपसरपंच ग्रा. पं. मालुटोला, मा गेंदलालजी टेंभरे पो. पा. मालुटोला, मा. मार्तंडजी पारधी अध्यक्ष तंटामुक्ती मालुटोला, मा. वसंताजी कुंभारे प्रदेशाध्यक्ष वि. शा क. प कन्हान मा. मिलिंदजी खोब्रागडे केंद्रीय सदस्य वि. शा. क. प. कन्हान, मा. डॉ. रामनाथजी पारधीकर जिल्हाध्यक्ष वि. शा. क. प. भंडारा,सौ.ज्योती वाघाये जिल्हा महिला प्रतिनिधी भंडारा मा.केशवजी फसाटे तालुकाध्यक्ष वि. शा. क. प.शाखा लाखनी, मा. साहेबराव टेंभरे, मा,भास्कर जी कमाने, डॉ. सरसराम पटले फुलेस्वर चवळे,प्रेमराज गोटेफोडे, उदाराम येळे, खुशाल पारधी, सौ. नंदा बाभरे,सौ.माया पारधी, मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला व विदर्भातील वर्धा, चंद्रपुर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली येथील कलावंतांनी आपल्या दंडार, भजन, किर्तन,नाटक नृत्य, गोंडी नृत्य, या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांना समाजप्रबोधनकेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंदजी खोब्रागडे यांनी केले, प्रास्ताविक डॉ. रामनाथजी पारधीकर यांनी केले. तर आभार मा. शेखर पटले यांनी केले.